no images were found
शिवाजी विद्यापीठामध्ये कचऱ्यापासून केली गांडूळ खत निर्मिती
कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती केली आहे.आज मा.कुलगुरू डी.टी.शिर्के यांच्या हस्ते पहिल्या बेडचे खत वितरीत करण्यात आले. यावेळी प्र.कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील,कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे,उपकुलसचिव श्री.अरुण ढेरे,समन्वयक डॉ.आर.जी.पवार अधिसभा सदस्य मा.धैर्यशील यादव उपस्थित होते.
कचरा व्यवस्थापन या संदर्भात एक बैठक आयोजित केली होती.त्यावेळी त्यांनी केंद्राचे समन्वयक डॉ.आर.जी.पवार यांना या संदर्भात सूचना केल्या होत्या.यावर डॉ.पवार यांनी एक या प्रकल्पाची समिती नेमून त्यावर काम सुरु केले.या समिती मध्ये पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ.असावरी जाधव ,उद्यान अधीक्षक श्री.अभिजित जाधव,स्वच्छता निरीक्षक श्री.शशिकांत साळुंखे हे सदस्य म्हणून वेळोवेळी काम पाहत होते व मार्गदर्शन करत होते विद्यापीठामध्ये रोज निर्माण होणारा पालापाचोळा,वसतिगृहातील खराब झालेल्या भाज्या हे सर्व एकत्रित करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून हे खत निर्माण केले आहे .यामुळे विद्यापीठ परिसरातील कचऱ्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट होत आहे.
माजी जिल्हा कृषी अधिकारी श्री.लतीफ शेख हे तज्ञ व्यक्ती म्हणून काम पाहत होते,कौशल्य विकास अधिकारी श्री.प्रमोद कांबळे यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले.