Home शैक्षणिक  प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे ‘बेस्ट प्रिन्सिपॉल इन काॅलेज  ESFE Expo 2023 मध्ये शिक्षण विभागाकडून पुरस्कार

 प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे ‘बेस्ट प्रिन्सिपॉल इन काॅलेज  ESFE Expo 2023 मध्ये शिक्षण विभागाकडून पुरस्कार

8 second read
0
0
31

no images were found

 प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे ‘बेस्ट प्रिन्सिपॉल इन काॅलेज  ESFE Expo 2023 मध्ये शिक्षण विभागाकडून पुरस्कार

कोल्हापूर(प्रतिनिधी): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून मुंबई येथे आयोजित Education Supply & Franchise Expo 2023 मध्ये ‘बेस्ट प्रिन्सिपॉल इन काॅलेज (कोल्हापूर)’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर प्रदर्शनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राचार्य, शिक्षक आदींना ‘Star Education Award 2023’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डाॅ. संजय दाभोळे यांनी ग्रामीण भागातून पुढे येताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. गेली २० वर्षे डिप्लोमा इंजिनिअरींग क्षेत्रात अध्यापन करताना ते गेली १५ वर्षे प्राचार्य म्हणून काम पाहात आहेत. महागाव (गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रूरल पाॅलिटेक्नीकमध्ये काॅलेजच्या पायाभरणीपासून १३ वर्षे प्राचार्यपदी उत्कृष्टरित्या काम केल्यानंतर ते एप्रिल २०२२ पासून न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्यपदी काम पाहात आहेत. अवघ्या दीड वर्षात त्यांनी काॅलेजचा कायापालट केला आहे व काॅलेजचा नावलौकिक वाढविला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे दोन नवीन अभ्यासक्रम तसेच अल्पमुदतीचे कोर्स उभारत त्यांनी येथील कारकिर्दीची सुरूवात केली. केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाचे ‘इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे कोर्सेस, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे ‘अधिकृत प्रशिक्षण केंद्र’ आणि प्रथितयश संस्थांचे रोजगारक्षम कोर्स विद्यार्थी व समाजातील होतकरू युवकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
त्याचबरोबर शासनाच्या व विविध संस्थांचे परिक्षा केंद्र उभारले आहे. न्यू पॉलिटेक्निकमधील विविध शाखांचे नूतनीकरण, परिसर सुशोभीकरण, वायफाय कॅम्पस, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विद्यार्थीकेंद्री प्रशासन, विविध सुविधा यातून त्यांनी अल्पावधीतच आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवला आहे. तंत्रशिक्षण विभाग व शासनाच्या शिखर संस्थांचा विश्वास संपादन करताना त्यांनी दिलेल्या प्रवेश प्रक्रिया, केंद्रीय परीक्षा, लोकसेवा आयोग परीक्षा आदी जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलल्या आहेत.
या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून ESFE एक्स्पोमध्ये हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…