Home सामाजिक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे यज्ञविषयक संशोधन सादर !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे यज्ञविषयक संशोधन सादर !

5 second read
0
0
24

no images were found

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे यज्ञविषयक संशोधन सादर !

‘सध्या जगभरातील वायुमंडलात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण न भूतो न भविष्यति एवढे वाढले आहे, हे अत्यंत चिंतेचे कारण आहे, असे हवामान शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र त्याही पेक्षा अधिक काळजीचे कारण ‘सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक प्रदूषणात, म्हणजे रज-तम या त्रिगुणांत झालेली वाढ’, हे आहे. यज्ञामुळे वायुमंडलातील रज-तमाचे प्रदूषण कमी होते, हे विविध वैज्ञानिक प्रयोगांतून स्पष्ट झाले आहे. यज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करणे, तसेच ती टिकवून ठेवणे यासाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे आणि साधना करणे आवश्यक आहे ’, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. नुकतेच नवी दिल्ली येथे झालेल्या ‘ट्वेंटिसेवेंथ इंडिया कॉन्फरन्स ऑफ वेव्ह्स ऑन मॅन अँड नेचर इन वेदिक ट्रेडिशन : मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह’ या राष्ट्रीय परिषदेत श्री. क्लार्क बोलत होते. त्यांनी ‘यज्ञामधील वायुमंडलाची आध्यात्मिक शुद्धी करण्याची क्षमता’, हा शोधनिबंध सादर केला. ज्याचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले हे असून, सहलेखक श्री. शॉन क्लार्क हे आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 18 राष्ट्रीय आणि 92 आंतरराष्ट्रीय, अशा एकूण 110 वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी 14 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.

श्री. क्लार्क यांनी आपल्या शोधनिबंधात जानेवारी 2022 मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात केल्या गेलेल्या 6 यज्ञांचा आध्यात्मिक स्तरावर होणार्‍या लाभांचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या माती, पाणी आणि वायु यांच्या वैज्ञानिक चाचण्यांचे निष्कर्ष मांडले. या चाचण्यांसाठी यज्ञापूर्वी आणि यज्ञानंतर माती, पाणी आणि वायु यांचे नमुने गोळा करतांना ते साधना करणार्‍या साधकांच्या घरातील, तसेच त्यांच्या शेजारी साधना न करणार्‍या घरातील, असे जोडीने घेण्यात आले. या तिन्ही प्रकारच्या नमुन्यांमधील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे मापन करण्यासाठी युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या भूतपूर्व अणु वैज्ञानिक डॉ मन्नम मूर्ती यांनी विकसित केलेल्या उपकरणाचा वापर करण्यात आला. यज्ञामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होणे, तर सकारात्मक ऊर्जा वाढणे, असा परिणाम दोन्ही घरांतील तिन्ही प्रकारच्या नमुन्यांच्या बाबतीत दिसून आला. साधकांच्या घरांतील नमुन्यांमध्ये हा परिणाम अधिक प्रमाणात आढळला; कारण साधना केल्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, तसेच सकारात्मकता वाढते आणि बाह्य सकारात्मकता ग्रहण करण्याची क्षमताही वाढते.

श्री. क्लार्क पुढे म्हणाले की, यज्ञाचा परिणाम यज्ञस्थळापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या भागांवरही होतो, हे यज्ञस्थळापासून विविध अंतरांवर असलेल्या ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत आढळले. एवढेच नाही, तर यज्ञाचा सकारात्मक परिणाम यज्ञ संपन्न झाल्यानंतर पुढेही काही काळ टिकून रहातो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…