Home राजकीय भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव

0 second read
0
0
26

no images were found

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव

कोल्हापूर : चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये मध्यप्रदेश छत्तीसगड राजस्थान या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले या भाजपाच्या यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला महिला वर्गाने फुगडीचा फेर धरून आनंद साजरा केला यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्वांना लाडू भरवण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकामध्ये महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांनी याच पद्धतीने जोमाने काम करून 2024 चा विजय गुलाल याच चौकामध्ये मोठ्या उत्साहात उधळण्यासाठी सर्वांनी शपथ घ्यावी असे सांगितले.
याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले चार राज्यांमध्ये 330 जागांवर भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना याची पोच पावती आजच्या निकालातून मिळाली याबद्दल देशाचे सक्षम गृहमंत्री अमित भाई शहा केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि तिन्ही राज्यातील जनतेचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले सातत्याने नरेंद्र मोदीजी यांना मौत का सौदागर, पनोती असे संबोधले गेले पण आजचे निकालाचे चित्र पाहता विरोधकांना ही चपराक म्हणावी लागेल आजच्या निकालामुळे आपल्या सर्वांचे मनोबल वाढले असून येत्या काळामध्ये आपण गाफील न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहून मोदीजींच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले
याप्रसंगी बोलताना प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले या निवडणुकीमध्ये भाजपा वरिष्ठ नेते चार पैकी तीन राज्यात यश संपादन होणार याबाबत आपल्या मतावर ठाम होते याचे कारण ज्या त्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले विकास काम होय आपल्या देशाचा विकास हेच नरेंद्रजी मोदी यांचे जीवनातील उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले देशाला अशाच पद्धतीच्या विकासाची आवश्यकता असून हा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास सर्वसामान्य जनतेला देखील झालेला आहे
यावेळी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या घोषणा दिल्या भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, जय श्रीराम असे नारे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली.
उपस्थित नावे
उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख सत्यजित नाना कदम हेमंत आराध्ये संतोष लाड शैलेश पाटील उमा इंगळे माधुरी नकाते धनश्री तोडकर विजयसिंह खाडे पाटील भरत काळे संतोष भिवटे रोहित पवार अमर साठे संगीता खाडे प्रदीप उलपे विशाल शिराळकर सतीश घरपणकर गिरीश साळुंखे अनिल कामत प्रग्नेश हमलाई अशोक लोहार सतीश आंबर्डेकर चंद्रकांत घाडगे संग्रामसिंह निकम अभिजित आमते पाटील तानाजी रणदिवे सुधीर खराडे अवधूत भाटे दिनेश संपतराव पवार अमित पसारे पसारे महादेव बिरंजे राजगणेश पोळ स्वाती कदम वीरेंद्र मोहिते महेश यादव किरण नकाते इक्बाल हकीम प्रदीप घाडगे सचिन सुतार नरेंद्र पाटील राजू जाधव दिलीप मैत्रानी मामा कोळवणकर विद्या बनसोडे विद्या बागडी भरती आडूरकर स्वाती तेली समयश्री अय्यर संध्या तेली सोमण
प्रणोती पाटील, रुपाली तोडकर, तेजस्वी पार्टे, संगीता पोळ, गवळी सुमित पारखे गैरव सातपुते रोहित कारंडे ओंकार गोसावी युवराज शिंदे सचिन मुधाळे
यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…