
no images were found
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींच्या विश्वासाचा आणि हिंदुत्वाचा विजय : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : NDA च्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आणि देशामध्ये परत एकदा NDA ची सत्ता येईल. अयोध्येतील राम मंदिर, देशातील ३७० कलम, जगामध्ये देशाला चौथी महासत्ता बनवू पाहणारी देशाची मा. नरेंद्रजी मोदी यांनी सर्व सुत्रे सांभाळली असून जनतेचा जनाधार पूर्ण मोदींच्या नेतृत्वाखाली NDA कडे असल्याचे या निवडणुकांमधून पहायला मिळाले. आजच्या निवडणुक निकालाने ३ राज्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व भाजपने दाखवून दिले. त्याचपध्दतीने येणाऱ्या महाराष्ट्रमधील निवडणुकीमध्ये देखली मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा युती सत्तेवर येईल. आणि त्याचबरोबर देशामध्ये व इतर राज्यामध्ये NDA ची सत्ता येईल. लोकांनी मा. नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व मान्य केले असून या नेतृत्वास दुसरी कोणतीही तोड नसून, जगामध्ये देशाला चौथी महासत्ता म्हणून बघण्याचे जे स्वप्न मा. नरेंद्रजी मोदी यांचे आहे त्याला सर्व देशवासियांनी पाठिंबा द्यावा. तसेच येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये युतीचा विजय झालेला दिसून येईल.