
no images were found
रात्रीस खेळ चाले`मधील शेवंताने घातला ट्रान्सपरंट टॉप
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ अवघ्या काही वेळातच हिट झाली. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडू लागलं होतं. विशेष म्हणजे अण्णा नाईक आणि शेवंता ही पात्र खूप गाजली. पाहता पाहता मालिका आणि त्यामधील पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ लागले. अण्णा म्हणू नका, किंवा मग आपल्या मादक अदांनी सर्वांनाच भूरळ घालणारी शेवंता असो. प्रत्येक पात्र सर्वांनाच हवंहवंसं वाटू लागलं. मात्र या मालिकेत अनेक चढ-उतार आले. या मालिकेचा दुसरा भाग प्रचंड हिट झाला होता. या मालिकेत माधव अभ्यंकर अण्णा नाईकांच्या भूमिकेत दिसले होते. तर शेवंता या पात्रात अपूर्वा नेमळेकर दिसली होती. अपूर्वाने शेवंता हे पात्र उचलून धरलं होतं.