
no images were found
व्यक्तिमत्त्व विकास आणि संप्रेषण कौशल्य यावर भावी शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या शिक्षणशास्त्र अधिविभाग व आजीवन शिक्षण आणि विस्तार अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भावी शिक्षकांसाठी एक दिवसीय
व्यक्तिमत्त्व विकास आणि संप्रेषण कौशल्य कार्यशाळा दिनांक 28 नोव्हेंबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये शिक्षणशास्त्र अधिविभागातील बी.एड.- एम.एड. (एकात्मिक) व एम. एड. अभ्यासक्रमाचे तसेच कोल्हापूर शहरांमधील अध्यापक विद्यालयांचे व महाविद्यालयांचे असे एकूण ८० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. या कार्यशाळेचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्वातील कमतरता यांना बलस्थाने करण्याबाबत भर दिला. तर सदर कार्यशाळेमध्ये प्रा. डॉ. तृप्ती करीकट्टी, प्रा. डॉ. ए. एम. गुरव आणि डॉ. बी एम हिर्डेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभले. सदर कार्यशाळचे आयोजक शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. एस. पाटणकर व आजीवन शिक्षण आणि विस्तार अधिविभागचे संचालक प्रा. डॉ. आर. जी. पवार हे होते. तर सदर कार्यशाळेसाठी समन्वयक डॉ. आर. यु. संकपाळ, श्री. वाय. एस. बोकील व डॉ. एन. एस. माळी तसेच दोन्ही अधिविभागातील सर्व शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मच्या र्यांचे सहकार्य लाभले.