
no images were found
मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सूचना असल्यास निवडणूक कार्यालयास पाठविण्याचे आवाहन
कोल्हापूर : मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजीची बैठक पुढे ढकलण्यात येऊन दि. 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता श्री शाहुजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, प्रतिनिधी यांची बैठक घेणार असून याबाबत काही सूचना असल्यास दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत dydeokolhapur@gmail.com या ई-मेल वर पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांना पुणे विभागातील 05 जिल्ह्यांसाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली.