
no images were found
दुष्काळग्रस्त तालुक्यात शासनाने मंजुरी दिलेल्या सवलती तात्काळ अंमलात आणा -राहुल रेखावार
कोल्हापूर : राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करुन त्या संबंधी सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यामध्ये शासनाने मंजुरी दिलेल्या सवलती लागू करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
मंजुरी देण्यात आलेल्या सवलती पुढीलप्रमाणे- जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सुट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रो.ह.यो. अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यातील गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती तात्काळ अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आले आहे.