Home शैक्षणिक डी वाय पी इंजिनीअरिंग साळोखेनगर मध्ये 10 डिसेंबर रोजी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा – गेल्या चार वर्षांपासून आयोजन

डी वाय पी इंजिनीअरिंग साळोखेनगर मध्ये 10 डिसेंबर रोजी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा – गेल्या चार वर्षांपासून आयोजन

11 second read
0
0
33

no images were found

डी वाय पी इंजिनीअरिंग साळोखेनगर मध्ये 10 डिसेंबर रोजी सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा – गेल्या चार वर्षांपासून आयोजन

कोल्हापूर (प्रतिनीधी ):साळोखेनगर येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी (१० डिसेंबर 2023) रोजी ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गुणवंत विद्यार्थ्याना ५० हजार रुपयांची बक्षिसे मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी दिली.     या वेळी कॅम्पस संचालक डॉ.अभिजीत माने म्हणाले, संस्थेचे उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून या परिक्षेची सुरवात झाली आहे. सध्याच्या संगणक युगात गणित या विषयाला अतिशय महत्व आले आहे. आयटी क्षेत्र असेल किंवा सध्याचे डेटा सायन्स अथवा मशीन लर्निंग सारखे नवीन क्षेत्र असो यामध्ये गणिताला महत्वाचे स्थान आहे. या संधीचा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ व्हावा व गणित या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भीती, त्याबाबतचा न्यूनगंड कमी होऊन विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेचे आयोजन केले जात आहे.

      संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. ऑब्जेक्टीव्ह पद्धतीने होणाऱ्या १०० गुणांच्या या परीक्षेत ५० प्रश्न असतील. यामध्ये प्रामुख्याने एमएचटी-सीईटी च्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सीईटी परीक्षेचा सरावही होणार आहे. तसेच परिक्षेनंतर आयआयटीच्या तज्ञ प्राध्यापकांकडून शंका निरसन करण्यासाठीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे.

       परीक्षेचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे २५ हजार १५ हजार व 10 हजार अशी बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यासाठी विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वर जाऊन https://forms.gle/e5mQpzDR9epjdneK6 अथवा प्रत्यक्ष महाविद्यालयात अशा पध्दतीने नोंदणी करु शकतात.तरी विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन ऍडमिशन डीन प्रवीण देसाई यांनी केले यावेळी प्राचार्य डॉ.सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील व ऍडमिशन समन्वयक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…