no images were found
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी तालुकानिहाय शिबीर
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांकडील शिष्यवृत्तीचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी दि. 29 नोव्हेंबर 2023 पासून तालुकानिहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनांतंर्गत लाभ मिळण्यासाठी जिल्हयातील सर्व शाळांनी सर्व पात्र विद्यार्थी, विद्यार्थिनींचे प्रस्ताव आवश्यक त्या माहितीसह व कागदपत्रांसह जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणा-या तालुकानिहाय कॅम्पच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
शिष्यवृत्तीची वरील योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असून योजनेची माहिती खालील प्रमाणे-
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती- विजाभज व इमाव, अनुसुचित जाती- इयत्ता 9 वी, 10 वी आवश्यक कागदपत्रे- विहीत नमुना अर्ज बँक पासबुक आधार संलग्न, आधार कार्ड, उपस्थिती प्रमाणपत्र (प्रमाणपत्र – ब गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने), मागील परिक्षेचे गुणपत्रक, तहसिलदार, सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा उत्पन्न दाखला (सन 2022-23), जातीचा दाखला (विद्यार्थ्यांचा) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला, अनुसुचित जाती व इतर मागास प्रवर्गातील इ.3 री ते इ.10 वी पर्यंतचे मान्यताप्राप्त निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी नियमित राहत असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी व शाळेचे पत्र आवश्यक. (टीप- अनुसुचित जाती व विजाभज प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा 2.00 लाख तसेच इतर मागास प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा 2.50 लाख)
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (फक्त मुलींसाठी)- इमाव- इ. 5 ते 7 वी व विजाभज, विमाप्र, अनु. जाती- इ. 8 वी ते 10 वी- बँक पासबुक आधार संलग्न असलेले आधार कार्ड, उपस्थिती प्रमाणपत्र (प्रमाणपत्र – ब गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रतिस्वाक्षरीने).
10 वी परीक्षा फी- अनु. जाती, विजाभज, विमाप्र- इ. 10 वी- बँक पासबुक आधार संलग्न असलेले आधार कार्ड, उपस्थिती प्रमाणपत्र (प्रमाणपत्र – ब गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रतिस्वाक्षरीने).
गुणवत्ता शिष्यवृत्ती- अनु. जाती इ. 5 वी ते 7 वी व विजाभज, विमाप्र इ. 8 वी ते 10 वी- बँक पासबुक आधार संलग्न असलेले आधार कार्ड, उपस्थिती प्रमाणपत्र (प्रमाणपत्र – ब गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रतिस्वाक्षरीने).
अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती- सर्व जाती धर्म- इ. 1 ली ते 10 वी- विहीत नमुना अर्ज बँक पासबुक आधार संलग्न, आधार कार्ड, उपस्थिती प्रमाणपत्र (प्रमाणपत्र – ब गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने), अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचा सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेला दाखला, मान्यताप्राप्त निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी नियमित निवासी राहत असल्याबाबतचा सक्षम प्राधिकारी व शाळेचे पत्र आवश्यक.
शिष्यवृत्तीसाठीचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी आयोजित कार्यशाळेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे-
करवीर- दि. 29 व 30 नोव्हेंबर – मुख्याध्यापक संघ, विक्रम हायस्कूल जवळ, कोल्हापूर,
गगनबावडा– 1 डिसेंबर -दत्ताजीराव मोहिते पाटील माध्य.विद्यालय तिसंगी,
कोल्हापूर शहर– 4 व 5 डिसेंबर-मुख्याध्यापक संघ,विक्रम हायस्कूल जवळ,कोल्हापूर,
शिरोळ– 6 व 7 डिसेंबर – झेले हायस्कूल, जयसिंगपूर स्टॅण्डजवळ, जयसिंगपूर,
पन्हाळा– 8 डिसेंबर- आनंदीबाई ब. सरनोबत गर्ल्स हायस्कूल, आसुर्ले-पोर्ले,
हातकणंगले- 11 व 12 डिसेंबर- मुख्याध्यापक,बळवंतराव यादव हायस्कूल, पेठवडगांव,
इचलकरंजी शहर– 13 व 14 डिसेंबर- तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, बीग बझारजवळ,इचलकरंजी,
कागल- 15 व 16 डिसेंबर- श्री.शाहू हायस्कूल, कागल,
आजरा-18 व 19 डिसेंबर- आजरा हायस्कूल,आजरा,
चंदगड- 20 व 21 डिसेंबर- न्यू इंग्लीश स्कूल, चंदगड,
गडहिंग्लज- 22 व 23 डिसेंबर- माध्यमिक शिक्षक सेवकांची पतसंस्था, गडहिंग्लज, डॉक्टर कॉलनी येथे गडहिंग्लज, भुदरगड-26 व 27 डिसेंबर- श्री मौनी महाराज (बनारस) हायस्कूल, गारगोटी,
राधानगरी-28 व 29 डिसेंबर- नागेश्वर हायस्कूल , राशिवडे बुद्रुक,
शाहुवाडी– 1 व 2 जानेवारी 2024- पंचायत समिती, शाहुवाडी याप्रमाणे राहील.