
no images were found
अल्पवयीनवर बलात्कार करणाऱ्यास 20 वर्षे शिक्षा
सांगली : शहरात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सादिक शिरतोडे (२४) याला २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली.
बालकाचे लैंगिक संरक्षण कायद्यान्वये दोषी ठरवून ही शिक्षा सुनावण्यात आली. हा केवळ गुन्हेगारी कायद्याचा भंग नसून सामाजिक गुन्हा आहे. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्याला २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र तथा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली.