no images were found
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला
उर्जा साठवणुकीच्या सीबीडी पद्धतीसाठी पेटंट
कोल्हापूर (प्रतिनीधी ) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी ऊर्जा साठवण्यासाठी बनवलेल्या कमी खर्चीक ‘सीबीडी’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ३० वे पेटंट आहे.
विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागाचे डीन व रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १५ ते २० वर्षापासून ऊर्जा साठवणुकीच्या पद्धतीवर संशोधक टीम सातत्याने काम करत आहेत. ऊर्जा साठवणुकीसाठी , बॅटरी, सुपरकॅपॅसिटरसह विविध प्रणालीचा वापर केला जातो. मात्र या प्रणाली फार खर्चीक आहेत. त्यामुळे डॉ. प्रा. सी.डी. लोखंडे व डॉ. उमाकांत म. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थ्यांनी कमी खर्चीक ‘सीबीडी’ ही पद्धत वापरुन ‘कोबाल्ट व्हॅनेडियम ऑक्साइड’ पदार्थाच्या पातळ फिती तयार केल्या आहेत. पातळ फितीमुळे पदार्थाची स्थिरता, ऊर्जा साठवण क्षमता, सुपरकॅपॅसिटरची लवचिकता वाढवण्यासाठी मदत होते.
या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे व डॉ. उमाकांत पाटील यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी संभाजी शिवाजी कुंभार, श्रद्धा बंडोपंत भोसले, विनोद वसंत पाटील, डॉ. प्रशांत देशमुख यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.