no images were found
उजास आणि स्टेफ्रीने महाराष्ट्रात सर्वात मोठी सॅनिटरी पॅड वितरण मोहिम राबवण्यासाठी केला सहयोग
सातारा : भारतातील वंचित मुलींमधील मासिक पाळी आरोग्यविषयक उत्पादनांच्या अभावामुळे मासिक पाळीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भातील समस्या ओळखत उजास व स्टेफ्रीने सॅनिटरी पॅड्स पुरवण्याकरिता सहयोग केला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमधील उजासचे वितरण प्रयत्न अधिक दृढ झाले आहेत. सॅनिटरी पॅड वितरण उपक्रमाव्यतिरिक्त उजास राज्यभरातील शाळांमध्ये मासिक पाळीदरम्यान आरोग्य व स्वच्छतेबाबत सर्वसमावेशक कार्यशाळांचे देखील आयोजन करणार आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम उजास १२ ते १५ वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थीनींमध्ये मासिक पाळीदरम्यान आरोग्य व स्वच्छता राखण्याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याप्रती समर्पित आहे. महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणारी वितरण शिबिरे शालेय विद्यार्थीनींना भारतातील आघाडीचा मासिक पाळी स्वच्छता ब्रॅण्ड स्टेफ्री पुरवतील, ज्यामुळे त्या स्वत:हून त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी व्यवस्थापन करू शकतील.
या सहयोगाचा भाग म्हणून मुंबई, पालघर, पुणे, सातारा, यवतमाळ, औरंगाबाद, नंदुरबार, अमरावती व वाशिममधील वंचित मुलींना ५००,००० हून अधिक स्टेफ्री सेक्युअर एक्सएल पॅक्स वितरित करण्यात येतील. या व्यापक वितरण प्रयत्नाव्यतिरिक्त उजास मासिक पाळीसंदर्भातील कलंक व गैरसमज दूर करत मुलींना मासिक पाळीदरम्यान आरोग्य व स्वच्छता पद्धतींच्या महत्त्वाबाबत माहिती देण्यासाठी जागरूकता सत्रांचे देखील आयोजन करेल.
उजास तळागाळातील उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक दृष्टीकोनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याशी समर्पित आहेत. उजासकडून मुली व मुलांसाठी मासिक पाळीदरम्यानच्या आरोग्याबाबत माहिती देणारी जागरूकता सत्रे, उत्पादन उपलब्धतेची खात्री आणि प्रगतीशील परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण अशाप्रकारचे उपक्रम राबवले जातात.
केनव्ह्यूच्या मार्केटिंगचे उपाध्यक्ष व एसेन्शियल हेल्थ बिझनेस युनिट हेड मनोज गाडगीळ म्हणाले, ”मासिक पाळीदरम्यान आरोग्यासंदर्भात जागरूकतेचा अभाव, तसेच किफायतशीर उच्च दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध असण्याबाबत कमतरता आणि अयोग्य स्वच्छता सुविधा हे प्रमुख अडथळे आहेत, ज्यामुळे विशेषत: ग्रामीण भागांमधील मुलींवर निर्बंध लादली जातात. स्टेफ्रीमध्ये आमचा दृढ विश्वास आहे की मासिक पाळीबाबत असलेली भिती, लाज व अस्वस्थतेला झुगारून प्रत्येक मुलीला तिची स्वप्ने साकारण्याचा अधिकार आहे.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत उजासच्या संस्थापक अद्वैतेशा बिर्ला म्हणाल्या, ”असे सहयोग मासिक पाळी आरोग्य उत्पादनांच्या उपलब्धतेमधील तफावत दूर करण्यासाठी आवश्यक स्रोत आहेत. सहयोगाने आपण जागरूकता, उपलब्धता व किफायतशीरपणा संदर्भातील आव्हानांचा सामना करू शकतो, ज्यांचा विशेषत: ग्रामीण भागांमधील तरूणींवर परिणाम होत होत आहे. उजास मासिक पाळी उत्पादनांबाबत अचूक माहिती व सोईस्कर सुविधा उपलब्ध करून देण्याप्रती कटिबद्ध आहे, ज्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांदरम्यान मुलींचे शाळांमधील अनुपस्थितीचे प्रमाण कमी होत आहे.