
no images were found
पी .बी. साळुंखे कन्या विदया मंदिर येथे समाजकार्य अभ्यासक्रमाच्या क्षेत्रकार्य अंतर्गत विविध उपक्रम
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अधिविभागाच्या समाजकार्य अभ्यासक्रमाअंतर्गत पी .बी. साळुंखे कन्या विदया मंदिर क्र ४७ या मनपा शाळेमध्ये विविध उपक्रम समाजकार्य विद्यार्थ्यांनी राबवले . यामध्ये व्यक्ती सहयोग कार्य,गटकार्य या समाजकार्याच्या पद्धतींसोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास पूरक उपक्रम राबविण्यात आले. दि. १० ऑगस्ट २०२३ ते ०३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विध्यार्थीनी स्वाती राऊत , शाहीन पाटील व प्रीती कांबळे यांनी पी .बी. साळुंखे कन्या विदया मंदिर येथे क्षेत्रकार्य करत असताना विद्यार्थाना शाळेतील विद्यार्थीनींसाठी विविध स्पर्धा जसे कि, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा,दहीहंडी उत्सव , रक्षाबंधन , वृक्षारोपण संगणक शिक्षण, इ. त्याचबरोबर समुदाय भेट, अंगणवाडी भेट , नगरसेवक भेट , आशा सेविका भेट , शिक्षण
प्रकल्पाधिकारी, फिरंगाई हॉस्पिटल व माजी नगरसेवक श्री.उत्तम कोराणे प्रभाग क्र. ५२२ यांची भेट घेऊन विविध समस्या आणि उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. काल दि ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी या क्षेत्रकार्याचा समारोप बक्षिस वितरण करून करण्यात आला, यासाठी माजी नगरसेवक श्री. कोराणे यांनी विद्यार्थाना उपयुक्त अशी बक्षिसे देऊन सहकार्य केले. सदर कार्यक्रमासाठी क्षेत्रकार्य मार्गदर्शिका डॉ. उर्मिला दशवंत सहायक प्राध्यापिका या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर पी .बी. साळुंखे कन्या विदया मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. गीता काळे मॅडम अध्यक्ष म्हणून लाभल्या. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समाजकार्य विद्यार्थिनी, शाळेतील सर्व शिक्षक , कर्मचाऱी व शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांनी मोलाचे सहकार्य केले.