Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थी चमकले

शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थी चमकले

0 second read
0
0
55

no images were found

शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थी चमकले

शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागामध्ये बी.टेक. फूड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजी (एडीसीईटी), आष्टा यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या “कुकिंग विदाउट फायर” आणि “आयडीयाथॉन “ स्पर्धेत यश संपादन केले आहे. यामध्ये विराज किरण पवार, प्रेमराज कैलास साळुंखे आणि सागर सुधीर मोरे या विद्यार्थ्यांना आयडीयाथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त झाला असून, या विद्यार्थ्यांनी “द फ्यूचर ऑफ फार्मिंग: हाइड्रोपोनिक्स अँड एरोपोनिक्स” या विषयावर सादरीकरण केले.
तसेच नितिन विलास सोन्ने व नंदिनी उत्तम साळवी यांना कुकिंग विदाउट फायर या स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त झाला असून, यांनी गाजर, बदाम, काजू, खोबरे आणि कंडेन्स्ड मिल्क इत्यादी पदार्थांचा वापर करून पौष्टिक लाडू बनवले. या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस. एन. सपली, फूड टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ. इरांणा उडचान, सहाय्यक प्राध्यापक श्री. वैभव बागे, डॉ. सिद्धार्थ लोखंडे आणि इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…