Home सामाजिक दिवाळीत अधिकाऱ्यांच “दिवाळ” काढण्याची वेळ येवू देवू नका : राजेश क्षीरसागर

दिवाळीत अधिकाऱ्यांच “दिवाळ” काढण्याची वेळ येवू देवू नका : राजेश क्षीरसागर

1 second read
0
0
44

no images were found

दिवाळीत अधिकाऱ्यांच “दिवाळ” काढण्याची वेळ येवू देवू नका : राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : ऐन सणासुदीच्या काळात शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असून, टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची यंत्रणाही तोकडी ठरत असल्याने टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. कोल्हापूरच्या नागरिकांनाच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिला. शहरातील विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे महानगरपालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
बैठकीच्या सुरवातीस माहिती देताना जलअभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी, बालिंगा उपसा केंद्र येथील शाहूकालीन पाण्याचे चेंबर ढासळले असल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. सदर पाणीपुरवठा व्यवस्था शाहूकालीन असून आजतागायत यास निधी दिला गेलेला नाही. सद्यस्थितीत सदर चेंबरची साफ सफाई करून पाणीपुरवठा सुरुळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील सी, डी वॉर्ड मध्ये सद्या पाणीपुरवठा बंद असून, याठिकाणी २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु, टँकरद्वारे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात नागरिकांची होणारी गैरसोय, जेष्ठ नागरिकांची शारीरिक क्षमता आदींचा विचार प्रशासन करत नाही. शहराच्या सर्वच भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देत आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. असे असताना शहराच्या पाणीपुरवठा आदी मुलभूत सोयीसुविधांसाठी आवश्यक दुरुस्ती, नूतनीकरणासाठी निधी मागणीचे प्रस्ताव महानगरपालिका सादर का करत नाही? असा सवाल अधिकाऱ्यांना केला.
यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, नागरिकांना मुबलक पाणी पुरविणे महानगरपालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण, शहरातील पाणीपुरवठा प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन सणासुदीच्या काळात माता-भगिनी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. अनेक ठिकाणी रस्ता रोको करून नागरिकांनी प्रशासनास धारेवर धरले आहे. नागरिकांमध्ये संताप वाढत चालला असून, त्यांच्या संयमाचा प्रशासनाने फायदा घेवू नये. दिवाळीच्या काळात अधिकाऱ्यांच “दिवाळ” काढण्याची वेळ नागरिकांवर येवू देवू नका. पाणीपुरवठा सुरुळीत होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु करा. आवश्यक वाटल्यास उपसा केंद्राच्या कामाची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी मार्ग अवलंबून नागरिकांना पाणीपुरवठा करा. येत्या तीन दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे, असा इशारा दिला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, जलअभियंता नेत्रदिप सरनोबत, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, उदय भोसले, निलेश हंकारे, सुरेश माने आदी उपस्थित होते.

थेट पाईपलाईन योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करणार : राजेश क्षीरसागर

काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना कोल्हापूरवासीयांची गेली अनेक वर्षांची मागणी आहे. ही योजना सद्यस्थितीत पूर्णत्वास येत आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याचे योजिले आहे. या योजनेचे उर्वरित काम काटेकोरपणे करण्यात यावे. योजना पुर्ण होताना त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहून पुन्हा नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागू नये याची दक्षता महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना देत राजेश क्षीरसागर यांनी थेट पाईपलाईनच्या कामाचाही आढावा यावेळी घेतला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…