Home शासकीय मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण.. विशेष शिबिरात मतदार नोंदणी करा

मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण.. विशेष शिबिरात मतदार नोंदणी करा

30 second read
0
0
29

no images were found

मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण.. विशेष शिबिरात मतदार नोंदणी करा

     

            कोल्हापूर  :   १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.  मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक – प्रारुप मतदार यादी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. दावे व हरकती 9 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करावेत. मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांतर्गत- सर्वसामान्य मतदार नोंदणीसाठी शनिवार दिनांक 4 व रविवार 5 नोव्हेंबर रोजी विशेष शिबीराचे आयोजन, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार 7 नोव्हेंबर 2023,  महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी – शनिवार 18 नोव्हेंबर व रविवार 19 नोव्हेंबर 2023. तृतीयपंथी व्यक्ती, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी – शनिवार 2 डिसेंबर व रविवार 3 डिसेंबर 2023. या विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. दावे व हरकती निकाली काढण्यासाठी मंगळवार 26 डिसेंबर 2023 पर्यंतची तारीख आहे. अंतिम मतदार यादी सोमवार 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती 274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी दिली आहे.

            1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांसाठी 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना आगाऊ मतदार नोंदणी करीता अर्ज करता येईल. मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या-त्या तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही संधी असल्याने पात्र नव मतदारांनी व नारिकांनी Voter Helpline App चा जास्तीत जास्त वापर करुन मतदार नोंदणी व तपशिल दुरुस्ती करावी, असे आवाहन हरिष धार्मिक यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…