no images were found
हृदयात ट्यूमर असलेल्या महिलेला ओपन हार्ट सर्जरी करून वाचवले
नागपूर: वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर या आघाडीच्या आरोग्य सेवा हॉस्पिटलने ओपन हार्ट सर्जरी करून हृदयातील ट्युमर यशस्वीरित्या काढून टाकला आणि एका महिलेचे प्राण वाचवले.जबलपूर येथील एका 58 वर्षीय महिला गेल्या 3 वर्षांपासून श्वासोच्छवास, धडधडणे आणि थकवा येण्याच्या तक्रारीसह वोक्हार्ट हॉस्पिटल्स मध्ये आली होती. महिलेने हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉ. अक्षय सिंग कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक सर्जन यांचा सल्ला घेतला. डॉ. अक्षय सिंग यांनी तिची अत्यंत बारकाईने तपासणी केली आणि तेंव्हा त्यांना तिच्या हृदयात ट्यूमर आढळला. २-डी इको, हृदयाचे स्कॅनिंग करण्यात आले.हा ट्यूमर काढून टाकण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी हा एकमेव पर्याय होता. डॉ.अक्षय सिंग यांनी शस्त्रक्रिया करून ट्यूमर सुरक्षितपणे काढला. डॉ. म्हणाले की हे हृदयाचे प्राथमिक ट्यूमर आहेत आणि ते .0017% ते .19% इतक्या घटनांसह दुर्मिळ आहेत. या ट्यूमरमध्ये एम्बोलिझम, इंट्रा कार्डियाक-ऑब्स्ट्रक्शन आणि ह्रदय निकामी होण्याची प्रवृत्ती असते.उपचार न केल्यास पक्षाघाताचा धोका निर्माण होऊ शकतो किंवा किडनी प्रभावित होऊ शकतात.ते पुढे म्हणाले, किरकोळ जोखीम पत्करून शस्त्रक्रिया सुरक्षितपणे केल्या जाऊ शकतात आणि जीव वाचवता येतो. 4 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर महिलेला स्थिर स्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. महिलेचे भाग्य होते की तिने वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉ. अक्षय सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी वेळेवर उपचार करून तिचे प्राण वाचवले. (लाइफ विन्स)
डॉ. अक्षय सिंग हे डॉ. एनबी (डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड) इन कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक सर्जरी आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन (एनबीई) द्वारे प्रदान केलेली ही एक सुपर स्पेशालिटी डिग्री आहे.डॉ. अक्षय सिंग हे एक समर्पित व्यावसायिक आहेत आणि प्रत्येक केसकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन आशावादी आहे आणि रुग्णावर उपचार करताना ते आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावतात. डॉ. म्हणाले, या केसमध्ये मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही वेळेवर आणि अचूक निर्णय घेतला आणि रुग्णाला वाचवले हे महत्त्वाचे आहे. लाइफ विन्स इन वोक्हार्ट हॉस्पिटल्स.डॉ. अक्षय सिंग वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरच्या टीममध्ये कार्डियाक सर्जरी विभागात सिनियर कंसल्टंट म्हणून रुजू झाले आहेत. ते सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या दरम्यान सर्व कामकाजाच्या दिवसांत कंसल्टेशन साठी उपलब्ध असतात . भेटीसाठी 0712-6624100 वर कॉल करा.श्री अभिनंदन दस्तेनवार, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, “हे खरोखरच आव्हानात्मक प्रकरण होते. आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ते अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केले आणि ओपन हार्ट सर्जरी यशस्वी झाली आणि रुग्णाला वाचवले.”