
no images were found
फटाक्यांच्या ध्वनी मापनाची सायबर कॉलेज ग्राऊंडवर चाचणी
कोल्हापूर: दिवाळी सणापूर्वी स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या ध्वनी मापनाची चाचणी सायबर कॉलेज ग्राऊंड येथे घेण्यात आली. सुट्टे फटाके, फटाक्यांच्या माळा यांसह विविध प्रकारच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता यावेळी मोजण्यात आली. विहित मर्यादेत असणाऱ्या फटाक्यांना प्रशासनाकडून दिवाळी सणादरम्यान बाजारात विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. शासन नियमानुसार विहित मर्यादेत नसणाऱ्या फटाक्यांना बंदी घालण्यात आली असून असे फटाके बाजारात विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. नागरिकांनी पर्यावरण पूरक, कमी आवाजाचे फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या चाचणीवेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे, उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, कोल्हापूर महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सायबर कॉलेजचे पर्यावरण विभाग प्रमुख धनंजय माळी, संचालक डॉ.एस.पी. रथ, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, अनिल चौगुले तसेच माध्यम प्रतिनिधी व अन्य सदस्य उपस्थित होते