no images were found
आस्क ऑटोमोटीव्ह लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 7 नोव्हेंबर 2023 पासून सुरू
आस्क ऑटोमोटीव्ह लिमिटेड (“एएसके” किंवा “कंपनी”), मंगळवार 7 नोव्हेंबर 2023 रोजी इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री खुली करेल.प्रमुख गुंतवणूकदार बोलीची तारीख सोमवार, सोमवार 6 नोव्हेंबर 2023 असेल. ऑफर मंगळवार 7 नोव्हेंबर 2023 रोजी सदस्यत्वासाठी खुली होईल आणि गुरूवार 9 नोव्हेंबर 2023 रोजी बंद होईल.प्रत्येक इक्विटी शेअरसाठी 268 रुपये ते 282 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 53 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 53 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 29,571,390 इक्विटी शेअर्सच्या एकूण ऑफर मध्ये कुलदीप सिंग राठी यांचे 20,699,973 पर्यंतचे इक्विटी समभाग आणि विजय राठी (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) यांचे 8,871,417 इक्विटी समभागांचा समावेश आहे. (“ऑफर फॉर सेल” किंवा “ऑफर”).इक्विटी शेअर्स 30 ऑक्टोबर 2023 रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“आरएचपी”) द्वारे नवी दिल्ली येथे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि हरयाणा सह सादर केले जात आहेत आणि ते बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई “) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) 2018 च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स 1957च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“क्यूआयबी s”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास क्यूआयबी च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि क्यूआयबी चा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व क्यूआयबी बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा प्रमाणित तत्वावर NIIs साठी बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 200,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 1,000,000 रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीतील दोन तृतीयांश भाग 1,000,000 रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“रिटेल श्रेणी”) उपलब्ध होईल. ऑफरच्या किमतीवर किंवा त्याहून अधिक मान्यताप्राप्त बोली साठी हे लागू असेल.