no images were found
यंदा दिवाळीला काय आहे खासॽ
दिवाळी सण जवळ असताना सर्वजण या आतुरतेने वाट पाहिले जाणाऱ्या सणासाठी तयारीला लागले आहेत. घराची साफसफाई, खरेदीची यादी व फराळ तयार करणे, नवीन कपडे खरेदी करण्यापासून मूळगावी भेट देण्याचे नियोजन करण्यापर्यंत दिवाळीकरिता तयारी जोरात सुरू आहे. ज्यामुळे उत्सवी उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वजण दिवाळी सण सजरा करण्यासाठी तयारी करत असताना एण्ड टीव्ही कलाकार यंदा दिवाळी साजरी करण्याबाबतच्या त्यांच्या योजनांविषयी सांगत आहेत. हे कलाकार आहेत नेहा जोशी (यशोदा, ‘दूसरी मॉं’), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘दूसरी मॉं’मधील नेहा जोशी ऊर्फ यशोदा म्हणाल्या, ”दिवाळी माझा आवडता सण असण्यासोबत माझ्यासाठी खूप खास आहे. मला दिवाळीदरम्यान घरी माझ्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करायला आवडते. मी यंदा दिवाळी सण साजरा करण्यास खूप उत्सुक आहे. मी मुंबईमध्ये माझे पती व कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. दिवाळीसाठी अजून दहा दिवस बाकी असले तरी मी खूप उत्सुक आहे आणि पॅकिंगला सुरूवात केली आहे (हसते). दिवाळी हा दिव्यांचा सण साजरा करताना मी पर्यावरणाची देखील काळजी घेते. मी फटाके वाजवत नाही, त्याऐवजी अनेक दिवे लावते. पर्यावरणपूरक पद्धतीने हा सण साजरा करण्यासाठी मी नुकतेच जयपूरमधील बापू बाजार येथे काही सुंदर हाताने रंगवलेले मातीचे दिवे विकत घेतले. माझ्या कुटुंबियांसाठी यंदाची दिवाळी विशेष करण्यासाठी मी पारंपारिक पोशाखांची खरेदी केली आहे. मी आशा करते की, त्यांना माझ्या निवडी आवडतील. बाजारांमध्ये उत्सवाचा उत्साह पसरलेला आहे, ज्यामुळे मी दिवाळीसाठी अधिक उत्साहित आहे. महाराष्ट्रीयन परपंरेनुसार आम्ही दिवाळीसाठी घरी फराळ बनवतो, जसे खोबरे व साखरेचे सारण असलेली करंजी, डाळ व तांदळाच्या मिश्रणापासून तयार केलेली कुरकुरीत चकली, भाजलेला पोहे, शेंगदाणे, काजू आणि डाळ यांचे स्वादिष्ट मिश्रण असलेला चिवडा. यंदा मी घरी आमच्या पाहुण्यांसाठी हा पारंपारिक फराळ तयार करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण असण्यासोबत सर्वांनी एकत्र येऊन धमाल साजरा करण्याचा क्षण आहे. मी माझ्या प्रियजनांसोबत दिवाळी साजरी करण्यास खूप उत्सुक आहे.”