no images were found
योगेश त्रिपाठी यांना आहे इतिहास व प्राचीन स्थळांची आवड
कामामधून काहीसा ब्रेक घेत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचा आनंद घेणे हा आपल्या मर्जीने जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे. काही व्यक्तींना नयनरम्य समुद्रकिनारी किंवा शांतमय पर्वतरांगांमध्ये भटकंतीचा आनंद घ्यायला आवडते, तर काही व्यक्तींना विविध साहसी कृत्यांचा आनंद घ्यायला आवडते. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन‘मध्ये दरोगा हप्पू सिंगची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय असलेले योगेश त्रिपाठी यांना गतकाळातील रहस्यांचा उलगडा करायला आवडते. अभिनेत्याला ऐतिहासिक स्मारकांना भेट द्यायला आवडते, तसेच त्यांना ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासह त्यांच्याबाबत माहिती जाणून घेण्यामधून आनंद मिळतो.
ऐतिहासिक स्मारकांना भेट देण्याच्या आवडीबाबत सांगताना मालिका ‘हप्पू की उलटन पलटन‘मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ”शालेय दिवसांपासून मला इतिहास व प्राचीन स्थळांची आवड आहे. मी राजवाडे व किल्ल्यांबाबत वाचत असताना कधीतरी त्यांना भेट देण्याच्या विचारामध्ये मग्न होऊन जातो. बालपणी मला काही बंधनांमुळे अशा स्थळांना भेट देता आली नाही. पण आता, मी माझे स्वप्न पूर्ण करत आहे. मी प्रवास करताना ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट देतो. यामुळे मला प्राचीन परंपरा माहित झाल्या आहेत, तसेच गतकाळातील जीवनशैलींबाबत समजले आहे. या प्रवासांदरत्यान विविध संस्कृतींचा शोध घेताना मला माझ्या वारसाशी संलग्न असल्यासारखे वाटते, इतिहास आपल्याला काहीतरी मोठ्या माहितीची जाणीव करून देतो यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतो. भारतातील सौंदर्य ऐतिहासिक स्मारकांमधून प्रकर्षाने दिसून येते. मी अनेक किल्ले व राजवाड्यांना भेट दिली आहे, नुकतेच मी ग्वाल्हेर किल्ल्याला भेट दिली, जो संपन्न इतिहासासाठी, विशेषत: ‘मनमंदिर‘ व गुजराती महाल राजवाड्यांसाठी ओळखला जातो. तोमर राजपूत राजा मानसिंग तोमर याने हा किल्ला बांधला. भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक ग्वाल्हेर किल्ला त्याची वास्तुकला व इतिहासाठी प्रसिद्ध आहे. मी वेळात वेळ काढून या किल्ल्याला भेट दिली आणि तेथील सौंदर्य पाहण्याचा आनंद घेतला. शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत नवरात्री कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर देखील मी सकाळी लवकर उठून किल्ल्यामध्ये सूर्योदयाचा आनंद घेतला. यंदा मी माझ्या कुटुंबासोबत उदयपूरला गेलो आणि तेथे माझी मुलांनी या अद्भुत स्मारकांची प्रशंसा केली. मी आशा करतो की, या भेटी त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण करतील आणि इतिहासाचा अधिकाधिक शोध घेण्यासाठी माझ्यासोबत नेहमी सोबती असतील.”