Home आरोग्य मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोद्यायला डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंट -कर्करोगाच्या जलद निदान करण्यासाठी उपयुक्त

मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोद्यायला डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंट -कर्करोगाच्या जलद निदान करण्यासाठी उपयुक्त

12 second read
0
0
45

no images were found

मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोद्यायला डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंट -कर्करोगाच्या जलद निदान करण्यासाठी उपयुक्त

कसबा बावडा/ प्रतिनिधी
डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या संशोधकांनी मानवी शरीरातील स्टेम सेल्स शोधण्यासाठी उपयुक्त ठरणारे उपकरण विकसित केले आहे. कर्करोगाच्या जलद निदानासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार असून भारतीय पेटंट कार्यालयाने ‘स्टेम सेल शोधण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल बायोसेन्सर उपकरणे’ या संशोधानासाठी पेटंट जाहीर केले आहे. विद्यापिठाला मिळालेले हे दुसरे डिझाईन पेटंट असून एकूण २९ वे पेटंट आहे.

      विद्यापीठाच्या सेंटर फोर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजच्या , स्टेम सेल आणि रीजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अर्पिता पांडे-तिवारी आणि त्यांची पीएचडी विद्यार्थिनी ऋतुजा प्रशांत गंभीर यानी हे संशोधन केले आहे. या उपकरणाची तंत्रज्ञान तयारी पातळी 4 (TRL-4) म्हणजेच प्रयोगशाळा चाचणी यशस्वी झाली आहे.

     स्टेम सेल्स या अद्वितीय पेशी असून त्यामध्ये मानवी शरीरात विविध प्रकारच्या पेशीं विकसित करण्यची उल्लेखनीय क्षमता असते. विशेषतः, कर्करोगाच्या प्रारंभ झाल्यानंतर स्टेम सेल मार्कर वाढू लागतात. म्हणूनच, कर्करोगाच्या जलद निदानासाठी अशा पेशींची तपासणी क्लिनिकल ऍप्लिकेशन्समध्ये महत्वाची भूमिका निभावतात. पेटंट प्राप्त झालेले हे उपकरण दिलेल्या नमुन्यातून स्टेम सेल्स शोधण्यात सक्षम आहे. मानवी शरीरात स्टेम सेल्स मर्यादित असल्याने, हा शोध स्टेम सेल आधारित निदान आणि उपचारांच्या क्षेत्रात प्रभावी ठरतो.

        याबाबत अधिक माहिती देताना डॉ. अर्पिता पांडे -तिवारी म्हणाल्या, “हे उपकरण म्हणजे स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी पोर्टेबल इलेक्ट्रोकेमिकल डिटेक्टर आहे. हे लहान आकारचे व हाताळण्यास अतिशय सोपे आहे. हे इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियांद्वारे नमुन्यामध्ये उपस्थित असलेल्या स्टेम सेल्सचे प्रमाण शोधण्यासाठी आणि त्याचे मापन करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी या सेन्सरचा चांगला उपयोग होऊ शकतो.

      या संशोधनासाठी रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रा. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी या संशोधनाबद्दल डॉ डॉ. अर्पिता पांडे-तिवारी आणि ऋतूजा गंभीर यांचे अभिनंदन केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एचडीएफसी  बँकेने पटकावला ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्कार

एचडीएफसी  बँकेने पटकावला ‘इंडियाज बेस्ट फॉर ‘एचएनडब्लू’ पुरस्कार   मुंबई,: युरोम…