no images were found
टेलिव्हिजन अभिनेत्रींनी सांगितले त्यांच्या करवा चौथ योजनांबाबत!
करवा चौथ हा प्रामुख्याने भारतात साजरा केला जाणारा पारंपारिक हिंदू सण आहे, जो विवाहित जोडप्यांमधील प्रेम आणि वचनाच्या दीर्घकालीन नात्याला साजरे करतो. विवाहित महिला सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात आणि त्यांच्या प्रिय पतीच्या दीर्घायुष्यासाठी व आरोग्यासाठी प्रार्थना करतात, ज्यामुळे हा सण लाखो व्यक्तींमध्ये लोकप्रिय आहे. करवा चौथ म्हणजे फक्त उपवास करणे असे नाही, तर हा पती-पत्नींमधील पवित्र नात्याचा उत्सव आहे, ज्याला सांस्कृतिक, सामाजिक आणि अगदी धार्मिक महत्त्व आहे. एण्ड टीव्हीवरील अभिनेत्री यंदा हा सण साजरा करण्याच्या त्यांच्या योजनांबाबत सांगत आहेत. या अभिनेत्री आहेत अनिता प्रधान (मालती देवी, ‘दूसरी माँ’), सपना सिकरवार (बिमलेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है’. मालिका ‘दूसरी माँ’मधील अनिता प्रधान ऊर्फ मालती देवी म्हणाल्या, ”विवाहित स्त्री असल्याने माझ्या मनात करवा चौथला खास स्थान आहे, जो प्रेम, सखोल भावना, समर्पण आणि अविरत भक्तीचे प्रतीक आहे. मी दरवर्षी या शुभ दिवसाची आतुरतेने वाट पाहते, उपवास करण्यास आणि माझ्या पतीसोबत करवा चौथचा आनंद घेण्यासह पवित्र परंपरांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असते. दरवर्षी मी सूर्याचा पहिला प्रकाशकिरण पृथ्वीवर पडण्यापूर्वी पहाटे लवकर उठते आणि सर्गी भोजनाचा आस्वाद घेते. संध्याकाळ होताच आमच्या घरातील महिला आकर्षक पेहरावामध्ये पवित्र पूजेसाठी एकत्र येतात. मी माझ्या हातावर सुरेख मेहंदी काढते आणि मोहक चुडी व ज्वेलरी परिधान करते. माझे पती व मी चंद्रोदयाची आतुरतने वाट पाहतो आणि रात्री आकाशात चंद्रोदय होताच आम्ही पाण्याचा घोट घेत व एकमेकांना स्वादिष्ट मिठाई भरवत उपवास सोडतो. माझ्याकडून हा खास दिवस साजरा करणाऱ्या सर्व महिलांना करवा चौथच्या आनंदमय शुभेच्छा.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील सपना सिकरवार ऊर्फ बिमलेश म्हणाल्या, ”करवा चौथच्या दिवशी माझी अधिक काळजी घेतली जाते आणि माझे पती माझ्यावर काळजी व प्रेमाचा वर्षाव करतात. दरवर्षी मी या दिवशी उपवास करते आणि माझे पती देखील उपवास करतात, ज्यामुळे मला एकटीच उपवास करत असल्यासारखे वाटत नाही. माझ्याकडून उपवास करणारी प्रत्येक महिला व त्यांच्या पतीला करवा चौथच्या आनंदमय शुभेच्छा.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, ”करवा चौथच्या सांस्कृतिक साजरीकरणामध्ये भावना, परंपरा व अतूट प्रेम सामावलेले आहे. ही फक्त प्रथा नसून विवाहाच्या दीर्घकालीन नात्याचे वचन आहे. मी दरवर्षी करवा चौथ करते आणि यंदा आई म्हणून हा सण साजरा करणार असल्यामुळे मी अधिक उत्साहित आहे.