no images were found
पाणीपट्टी 50 टक्के सवलत योजनेमधून 4 कोटी 14 लाख वसूल
कोल्हापूर : पाणीपट्टी विभागाच्या 50 टक्के सवलत योजनेमधून आज शेवटच्या दिवशी 4 कोटी 14 लाख 71 हजार 171 इतकी रक्कम वसुल झाली आहे. या सवलत योजनेअंतर्गत दिनांक 1 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 अखेर सुमारे 10 हजार 877 कनेक्शनधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये सुमारे रु.31 लाख 11 हजार 987 इतका विलंब आकार माफ करण्यात आला आहे. तर रु.31 लाख 64 हजार 243 इतका विलंब आकार आणि रु.3 कोटी 83 लाख 6 हजार 929 इतकी थकीत पाणी बिलाची रक्कम अशी 4 कोटी 14 लाख 71 हजार 171 इतकी रक्कम वसुल करण्यात आली आहे. यामध्ये नागरी सुविधा केंद्रामार्फत 7 हजार 405 नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये ऑनलाईन सुविधेद्वारे सुमारे 579 इतक्या नागरिकांनी तर गुगलपे, फोन पे, पेटीएम या ऍ़ड्रॉईड ऍ़पद्वारे 2 हजार 753 लोकांनी लाभ घेतला आहे. तर स्पॉटबिल प्रणालीमार्फत 140 लोकांनी लाभ घेतला आहे.
सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता रु.77 कोटी इतके उद्दिष्ट देण्यात आले असून आज अखेर रु.40 कोटी 66 लाख 16 हजार म्हणजेच 52.81 टक्के वसुली करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 01 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 अखेर थकीत रक्कम एकरक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मिटर रिडर यांचेशी संपर्क साधावा किंवा नजीकच्या नागरी सुविधा केंद्रास भेट द्यावी. तसेच गुगल-पे, फोन-पे, पेटीएम इ. मोबाईल ऍ़पद्वारे तसेच ऑनलाईन सुविधेद्वारे रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त नारिकांनी लाभ घ्यावा असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.