no images were found
आमच्यात जे ठरलंय तसंच होईल – निलेश राणें
सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणेंची नाराजी भाजपच्या नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केल्यानंतर आज ते प्रथमच सिंधुदुर्गात आले.यावेळी कुडाळ व मालवण मधील शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आज जिल्ह्यात सर्वत्र निलेश राणेंच्या स्वागताची व शेकडो गाड्यांच्या ताफ्याचीच चर्चा केली जात होती.
माजी खासदार निलेश राणे यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर तात्काळ भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली.त्यानंतर निलेश राणे यांनी आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय २४ तासात मागे घेतला आहे.भाजप नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेऊन समजूत काढली.त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी दोघांनी मिळून पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता निलेश राणे यांनी आपला निर्णय बदलत, राजकारणात सक्रिय राहण्याची भूमिका घेतली आहे.
माझ्या कार्यकर्त्यांनी जे माझ्यासाठी केलं आहे, ते सांगणं कठीण आहे. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहीन. मी फडणवीस साहेबांना जेव्हा भेटलो आणि त्यांनी मला जो विश्वास दिला. त्यावर मी पुन्हा जोमाने कामाला लागलोय माझा फडणवीस साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. आमची जी चर्चा झाली, त्यामुळे माझा विश्वास आहे की, शंभर टक्के तसं होईल. म्हणून मी कामाला लागलेलो आहे. मला जे वाटत होतं ते मी माझ्या नेत्यांना सांगितलेलं आहे. माझा माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो या अनुषंगाने कामाला सुरुवात केलेली आहे. कोकणामध्ये नेत्यांच्या सांगण्यावरून निवडून आणायचे आहेत. त्याच अनुषंगाने आज काम सुरू केलेला आहे. शंभर टक्के माझा विश्वास आहे. भाजच्या ज्या सीट असतील त्या शंभर टक्के निवडून येतील,असा मला विश्वास आहे. निलेश राणे यांची नाराजी नाट्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.