no images were found
पंडित नेहरूंमुळे ती आयुष्यभर अविवाहित राहिली.?
६ डिसेंबर १९५९ चा तो दिवस होता. पंडित जवाहरलाल नेहरू पंचेत डॅमच्या उद्घाटनाला रांचीमध्ये गेले होते. या उद्घाटन सोहळ्यात त्यावेळी एक आदिवासी महिला उपस्थित होती. पंडित नेहरूंमुळे ती आयुष्यभर अविवाहित राहिली. मात्र असे का? त्यामागे एक खास किस्सा आहे. उद्घाटन सोहळ्यात पंडित नेहरूंच्या स्वागतासाठी बुधनी मांझियाइन नावाच्या महिलेने त्यांच्या गळ्यात हार घातला होता. त्यावेळी ती घाट भागात रोजंदारीचे काम करत होती. पंडित नेहरूचे स्वागत करण्याची संधी जेव्हा तिला देण्यात आली तेव्हा ती फार खूश झाली होती. त्यावेळी ती फक्त १५ वर्षांची होती.
तो दिवस बुधनीसाठी खास होता पण..नेहरूंचे तिच्या हस्ते स्वागत होणार हाच तिच्या आयुष्यातील खास दिवस होता. त्यासाठी ती तिच्या संस्कृतीनुसार नटून थटून या कार्यक्रमाला आली होती. कार्यक्रमात तिने पंडित जवाहरलाल नेहरूंच्या गळ्यात फुलांचा हार घातला होता. आणि त्यांच्या कपाळावर टिळा लावला होता. त्यानंतर नेहरूंनी उद्घाटनस्थळी बुधनीच्या हस्ते डॅमच्या दारांचे बटन सुरू करून त्याचे उद्घाटन केले होते.बुधनीच्या आयुष्यातील खास दिवस तिच्यासाठी ठरला दुर्दैवीबुधनीच्या आयुष्यातील सगळ्यात खास दिवस तिच्यासाठी एवढा दुर्दैवी ठरेल याचा तिने कधी विचारही केला नव्हता. उद्घाटनानंतर जेव्हा ती तिच्या गावी परत गेली तेव्हा तिच्यासाठी तिच्या घराची दारं कायमची बंद झाली होती. तिच्या समाजाच्या लोकांनी तिचा बहिष्कार केला होता. तिने नेहरूंच्या गळ्यात हार घालून त्यांच्याशी लग्नच केले असे म्हणून तिला घरातून बाहेर काढले गेले.
नेहरूची पत्नी म्हणून ओळखसमाजातील प्रमुख लोकांनी दुसऱ्या दिवशी पंचायत बोलवली आणि बुधनीचे नेहरूंशी लग्न झाले आहे, तेव्हा तिच्याशी कुठलाच पुरुष आता लग्न करू शकत नाही असा निर्णय या पंचायतीत देण्यात आला. नेहरू संथाळ समाजाचे नव्हते. त्यामुळे बुधनीने दुसऱ्या समाजात लग्न केल्याचा मोठा गुन्हा केलाय असे म्हणत तिला गावाच्या बाहेर निघण्याची शिक्षा देण्यात आली. बुधनीच्या कुटुंबियांनीसुद्धा यावेळी तिची बाजू घेतली नव्हती.
बुधनी दारोदारी यावेळी मदतीसाठी भटकत होती पण तिला कोणी आश्रय दिला नाही. अखेर पंचेतमध्ये राहणाऱ्या सुधीर दत्ताने तिला त्याच्या घरी राहण्यास सांगितले. हे दोघे नंतर पती पत्नीप्रमाणे एकत्र राहू लागले. सुधीर आणि बुधनीने लग्न केले नव्हते. पण त्यांना एक मुलगी झाली. जिचे नाव होते रत्ना. रत्नासाठी संथाळ समाजाचा मुलगा शोधू नये अशी चेतावणीसुद्धा यावेळी देण्यात आली होती.बुधनीला नंतर अचानक १९६२ मध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात आले. नोकरीवरून काढून टाकण्याचे कारणसुद्धा तिला सांगण्यात आले नव्हते. नंतर १९९५ मध्ये जेव्हा राजीव गांधी पंतप्रधानपदी होते तेव्हा त्यांनी दिल्लीला बुधनीची भेट घेतली. राजीव गांधींनी परत तिला डीवीसीमध्ये काम मिळवून दिले. जिथे तिने रिटायरमेंटपर्यंत काम केले.