no images were found
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स प्रत्येक गावात विमा सेवासुविधा पोहोचवणार
ऑक्टोबर : देशातील सर्वात मोठ्या खाजगी जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने आपली ‘सर्वत्र विमा’ पहल सुरु केली आहे. भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे व गावांमध्ये विमा सेवासुविधांच्या उपलब्धतेतील कमतरता दूर करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आखण्यात आला आहे. ‘हर घर BAGIC’ (BAGIC – Bajaj Allianz General Insurance Company) मिशनला अनुसरून प्रत्येक घरी आणि प्रत्येक नागरिकापर्यंत विमा उत्पादने व सेवा पोहोचवणे हा कंपनीचा उद्देश आहे.
‘सर्वत्र विमा’ उपक्रमांतर्गत, एका पूर्ण कार्यक्षम आणि सुसज्ज व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तपन सिंघल यांनी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्सच्या कार्यालय परिसरातून या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला. ही व्हॅन कोल्हापुरात पोहोचेल आणि महाराष्ट्राच्या पश्चिम विभागातील भागातून जात, या प्रदेशातील ३० हून अधिक तालुक्यांतील ३५०० पेक्षा जास्त गावांमध्ये विमा सेवासुविधा पोहोचवेल. या भागातील ग्राहकांना आरोग्य, मोटर, मालमत्ता, शेती आणि लायबिलिटीसह विमा उपाययोजना प्रदान करणे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
देशात द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरे व गावांमध्ये कंपनीचे स्थान मजबूत करणे आणि लोकांना विमासंबंधी सर्व सेवासुविधा सहज मिळवता येतील असे वन-स्टॉप सोल्युशन प्रदान करणे हा ‘सर्वत्र विमा’ उपक्रमाचा उद्देश आहे. पॉलिसी इश्यू करणे, क्लेमसाठी तज्ञ मदत पुरवणे, वॉक-इन ग्राहक सेवा आणि व्हिडिओवर मेडिकल मूल्यमापन यांचा या सेवांमध्ये समावेश आहे. विम्याचे संपूर्ण जीवनचक्र ग्रामीण भारताच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवणे हे याचे सर्वात मोठे आणि प्राथमिक उद्दिष्ट आहे, जेणेकरून विम्याची पोहोच आणि ग्राहकांच्या अनुभवात वाढ होऊ शकेल. टेक्नॉलॉजी आणि डिजिटल ऍसेट्ससह, ऑन-द-स्पॉट क्लेम सेटलमेंटच्या लाभांसह सर्व विमा सेवांमध्ये तेजी आणणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. याशिवाय लोकांना विम्याचे महत्त्व समजावून सांगणे व विम्याच्या लाभांविषयी जागरूकता निर्माण करणे हा देखील यामागचा उद्देश आहे.
‘सर्वत्र विमा’ उपक्रमाविषयी बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री. तपन सिंघल यांनी सांगितले, “विमा उद्योगातील हा अशा प्रकारचा पहिला आणि अनोखा उपक्रम आहे. विमा सेवासुविधांची पोहोच वाढवणे आणि आपल्या देशातील द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये अधिक जलद गतीने विमा सेवा प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. आम्ही कोल्हापूरपासून सुरुवात करून महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आमच्या विमा मोबिलिटी सेवा विस्तार करण्यासाठी एक यात्रा सुरु करत आहोत, यामध्ये ३५०० पेक्षा जास्त गावांमधील लोकांच्या घरांपर्यंत संपूर्ण विमा सेवा प्रभावीपणे पोहोचवल्या जातील.
२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या आयआरडीएआयच्या दृष्टिकोनानुसार, हा उपक्रम विमा वाहक आणि विमा विस्तार यासारख्या आगामी रेग्युलेटरी मुद्द्यांना सुविधाजनक बनवण्यात मदत करेल, ज्यामुळे विमा सेवासुविधांची पोहोच वाढवण्यात मदत होईल. असे केल्याने सामुदायिक संबंध दृढ होतील, आर्थिक सुरक्षा वाढवून, लोकांना सन्मानजनक जीवन प्रदान करून, अगदी शेवटच्या स्तरापर्यंत सेवा उपलब्धता पोहोचवून, पारंपरिक बाधा दूर करून, वंचित क्षेत्रांपर्यंत सेवा पोहोचवण्याच्या जवळ जात आहोत.”