
no images were found
ऊस उत्पादन वाढीतील हुकुमी एक्का महाधन क्रॉपटेक खत
ऊस पीक त्याच्या साखरेच्या रूपाने प्रतिध्वनीत करत असते. गेल्या अनेक वर्षांपासून साखर निर्मितीमध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे परंतु नजीकच्या काळात उत्तरप्रदेश महाराष्ट्राला याबाबतीत टफ फाईट देतो आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्राने १०५.३ लाख मे. टन तर उत्तरप्रदेशने १०१.८ लाख मे .टन साखरेचे उत्पादन केले. महाराष्ट्राची साखर उत्पादकता मागच्या हंगामा मध्ये त्याच्या आधीच्या वर्षीपेक्षा ३२ लाख मे. टनाने घसरली आहे. या घसरणीस इतर अनेक वातावरणीय घटकांसोबतच, जमीनीचे ढासळत चाललेले आरोग्यही केंद्र स्थानी आहे. जमिनीच्या ढासळणाऱ्या आरोग्यामुळे पिकाचे पोषण संबधीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. जमिनीचा वाढत चाललेला सामू (पीएच), घसरलेला सेंद्रिय कर्ब, सूक्ष्म अन्नद्रव्यांची वाढती कमतरता इत्यादी बाबी जमिनीच्या ढासळणाऱ्या आरोग्यात महत्वाच्या आहेत.
महाधन, या खत क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कंपनीने, शेतकऱ्यांच्या या मूलभूत समस्यांचा खोलात जावून अभ्यास केला व त्यावर मात करण्यासाठी एकात्मिक खत नियोजनाचा प्रभावी असा पर्याय पुढे आणला. त्याबद्दल आपण जाणून घेऊया
शेतकरी बंधूंनो, महाधनचे “क्रॉपटेक ऊस” हे पिकपोषण समाधान अत्यंत प्रभावी, संतुलित व संपूर्ण समाधान आहे. भारतात अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरलेले असे हे एकमेव उत्पादन आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या खत नियोजनातील मुख्य समस्या तसेच पिकाची योग्य गरज ओळखून त्याची रचना केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला वापरताना सुटसुटीतपणा येतो व खतांचे संतुलन बिघडण्याचा कोणताही धोका राहत नाही त्यामुळे शेतकरी निश्चिन्त होतो. या खतात पिकाला अत्यावश्यक अशा ८ प्रकारच्या पीक पोषक घटकांचा समावेश केला आहे की ज्यांचे प्रमाण खताच्या प्रत्येक दाण्यादाण्यात सारखेच असते व या अन्नद्रव्यांची बऱ्याच जमिनीत कमतरता असल्याने पीक उत्पादनावर ते थेट परिणाम करते. या व्यतिरिक्त या खतात अत्यंत कार्यक्षम असे अन्न उपलब्धता तंत्रज्ञान वापरलेले आहे की ज्यामुळे सामान्य खतांच्या तुलनेत ही खते जास्त कार्यक्षम व प्रभावी आहेत. चांगल्या उत्पादनासाठी विचार केल्यास खत व्यवस्थापनातील चार महत्वाच्या तत्वांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. जसे की खते कधी, कुठे, किती आणि कोणती टाकावीत. सामान्य खतांमधून पोषण व्यवस्थापन करताना बाजारातून अनेक प्रकारची खते खरेदीकरून त्यांचा वापर करावा लागतो तसेच जमिनीत टाकताना वेगवेगळी खते एक सारख्याप्रमाणात टाकणेही जिकीरीचे होते व त्यामुळे खतांवरील तसेच मजुरी खर्चात वाढ होते. परंतु महाधन क्रॉपटेकमुळे या सर्व समस्या निकाली निघतात त्यामुळे खर्च आटोक्यात येऊन पिकाचा खताला मिळणारा प्रतिसाद वाढतो व एकंदर उत्पादन व उत्पन्नात भरघोस वाढ होते. ऊस पिकासाठी महाधन क्रॉपटेकची ९:२४:२४ ही ग्रेड शिफारीत करण्यात आलेली आहे. संशोधन प्रयोग व शेतकऱ्यांकडील प्रात्यक्षिक प्रयोगांतून महाधन क्रॉपटेक खताचे पुढील फायदे दिसून आले आहेत.
१. ऊसाच्या खतांवरील खर्चात कमीतकमी १०% बचत
२. गाळपयोग्य ऊसाच्या संख्येत ५% ने वाढ
३. ऊसाच्या पेरांच्यां संख्येत व जाड़ी मध्ये ५ % ने वाढ
४. उसाच्या उत्पादनात १० ते १२% ने वाढ