Home शासकीय राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्यावा-   जिल्हाधिकारी रेखावार

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्यावा-   जिल्हाधिकारी रेखावार

1 second read
0
0
39

no images were found

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्यावा–   जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर :  राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर द्यावा आणि स्पर्धेसाठीचे प्रस्ताव विहित वेळेत सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल यांच्या अध्यक्षतेखाली अभियान संदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीस तहसीलदार अर्चना कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेमध्ये शासकीय विभागांनी कृती आराखडा सादर करताना कार्यालयीन अभिलेख कक्ष, नस्तीचे वर्गीकरण व डिजिटलायझेशन, कर्मचारी बैठक व्यवस्था, दिव्यांग व महिला कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी व्यवस्था, सेवा पुस्तके, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, दैनंदिन कामकाजाचा निपटारा, शून्य प्रलंबितता, कार्यालयीन सुधारणा, सेवा हमी प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा याबरोबरच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा या बाबींना प्राधान्य द्यावे.

जिल्हा, विभाग व तालुकास्तरावर हे अभियान व स्पर्धा राबविण्यात येणार असून अभियानांतर्गत सहभाग घेवून सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये, अधिकारी व सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम सूचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे.

अभियानाचा कृती कालावधी 20 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर असा  आहे. तर स्पर्धेसाठी विचारात घ्यावयाचा कालावधी  20 ऑगस्ट पासून एक वर्षाचा राहणार आहे असे बैठकीत सांगण्यात आले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…