
no images were found
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांना पितृशोक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचे वडील शंकरराव नरसिंगराव पाटील (वय ८५ वर्षे) यांचे आज सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
शंकरराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एम.एस.ई.बी.) येथे सुमारे ४० वर्षे सेवा केली. त्यापैकी ३० वर्षे सांगली येथे आणि प्रकाशगड (मुंबई) येथे १० वर्षे सेवा बजावली. त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी (दि. १८) सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होईल.