Home क्राईम ड्रायव्हर अन् नोकराच्या नावावर ८ कोटींची संपत्ती ?

ड्रायव्हर अन् नोकराच्या नावावर ८ कोटींची संपत्ती ?

0 second read
0
0
46

no images were found

ड्रायव्हर अन् नोकराच्या नावावर ८ कोटींची संपत्ती ?

कानपूर – जर तुम्हीही कर चुकवण्यासाठी आणि काळा पैसा लपवण्यासाठी बेनामी संपत्तीचा आधार घेत असाल तर सतर्क राहा. कानपूर इथं आयकर विभागाने बेनामी संपत्तीवर कारवाई करत ११ जणांच्या मालमत्ता जप्त केल्या आहे. या संपत्ती ड्रायव्हर अथवा नोकराच्या नावावर खरेदी करून तपास यंत्रणांपासून वाचण्याचा डाव होता. आयकर विभागाने शहरातील अशा अनेक बेनामी मालमत्तांची यादी तयारी केली आहे. लवकरच या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने ८ कोटीची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. बलाढ्य लोकांनी त्यांची कमाई लपवण्यासाठी त्यांच्या ड्रायव्हर आणि नोकराच्या नावावर कोट्यवधींची माया जमवली होती. इतकेत नाही तर पैसा एकाच्या खात्यावरून दुसऱ्याकडे, दुसऱ्याच्या खात्यावरून तिसऱ्याकडे आणि त्यानंतर पुन्हा तिसऱ्याकडून पहिल्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्याचा डाव खेळला जात होता.
कल्याणपूर इथं राहणाऱ्या अभिषेक शुक्लाने जमीन खरेदीसाठी त्याच्या नोकरांचा वापर केला. बिठूरमध्ये मृत घसीटारामची अनेक एकर जमीन नातवासोबत मिळून खरेदी केली. सरकार आणि एजन्सीच्या नजरेपासून लपण्यासाठी याचा पैसा अभिषेक शुक्लाने त्याच्या २ जवळच्या लोकांच्या नावावर ट्रान्सफर केले. त्यानंतर खात्यावरील पैसे घसीटाराम आणि त्याचा नातू मनिष सिंहच्या अकाऊंटवर पाठवले. संयुक्त खात्यातून मनिष सिंहने खासगी खात्यावर पैसे पाठवले. त्यानंतर मनिष सिंह अकाऊंटवरून हा पैसा पुन्हा अभिषेक शुक्लाला परत दिला. अशाचप्रकारे घोळ करून अभिषेक शुक्लाने १० संपत्ती जमवल्या.
तसेच बेनामी संपत्तीविरोधात दुसरी मोठी कारवाई सूरज सिंग पटेल आणि त्यांची पत्नी रीना सिंग यांच्यावर करण्यात आली आहे. त्यांनी सुमारे ५५ लाख रुपयांची जमीन त्यांचा चालक धर्मेंद्र यांच्या नावावर खरेदी केली आहे. हे दाम्पत्य ओबीसी आहे. मात्र त्यांनी दलित व्यक्तीची जमीन त्यांच्या एससी चालक धर्मेंद्र यांच्या नावावर खरेदी केली होती. आयटीच्या बेनामी मालमत्ता शाखेने त्यांची ५५ लाख रुपयांची बेनामी मालमत्ताही जप्त केली आहे. हे दाम्पत्य कानपूरचे रहिवासी आहे. पण सध्या बहरीनमध्ये काम करते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…