
no images were found
….तर मोदी नवी ‘यूनो’ निर्माण करतील : मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे: ‘नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचे स्थान निर्माण केले असले, तरी अद्याप प्रगत राष्ट्रांच्या ‘यूनो’चे सदस्यत्व देशाला अजून मिळालेले नाही.
आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी ‘यूनो’ संघटना निर्माण करतील.
मोदी यांनी कोव्हिड काळात ६० देशांना मदत करून लस आणि अन्नधान्य पुरवले आहे. हे ६० देश मोदींच्या नेतृत्वात नव्या ‘यूनो’ संघटनेचे सदस्य होण्यासाठी तयार असतील,’ अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. डीईएस पुणे विद्यापीठाच्या शुभारभप्रसंगी पाटील बोलत होते.
आपल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात तीन हजार वर्षे पुराणाची आहेत. मात्र, पुराण झाले की नाही, याबाबतीत आपली शंका असते. राम होते की नाही, याबाबतही आपली एक श्रद्धा असते. मात्र, राम आमचा मूळपुरुष आहे, असा विश्वास असतो. तरीही त्याबाबतीत आपण राम होते की नाही, असे म्हणतो,’ असे वक्तव्य पाटील यांनी या वेळी केले.