no images were found
कार्पोरेट जनसंपर्कात विविध संधी : यादव
कोल्हापूर( प्रतिनिधी ): कार्पोरेट जनसंपर्कामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असून त्यासाठी विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत, असे प्रतिपादन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरचे जनसंपर्क अधिकारी सचिन यादव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागात कार्पोरेट पब्लिक रिलेशन्समधील विविध संधी या विषयावर ते बोलत होते.
यादव म्हणाले, विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट कम्युनिकेशन या क्षेत्रात नव्याने संधी निर्माण होत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी विविध भाषा शिकणे गरजेचे आहे. आज अनेक क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करता येते. यासाठी आपल्याला संवाद कौशल्य महत्वाची आहेत. माहिती प्रसारण क्षेत्राचा अभ्यासही तितकाच आवश्यक आहे.
मास कम्युनिकेशचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी डॉ.सुमेधा साळुंखे, डॉ. प्रसाद ठाकूर उपस्थित होते.