no images were found
शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जोमाने कामाला लागा : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांची शिवसेना शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस राज्यभरातील जनतेतून उदंड प्रतिसाद मिळत असून त्याचा परिपाक महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. शिवसेना पक्षाच्या जिल्हास्तरीय विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेनेच्या वतीने पुढीलप्रमाणे पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर श्री.सुहास बालाजी साका, शिवसेना महिला आघाडी दक्षिण शहरप्रमुख पदी सौ.अमरजा अवधूत पाटील, शिवसेना कोल्हापूर दक्षिण शहर समन्वयक श्री.संतोष संभाजी घाटगे, शिवसेना तालुकाप्रमुख पदी श्री.प्रकाश प्रल्हाद सूर्यवंशी, श्री.सचिन संपतराव पाटील, श्री.मारुती पांडुरंग खडके, श्री.सचिन भोसले, शिवसेना उप-तालुकाप्रमुख पदावर श्री.राजेंद्र दत्तात्रय सरनाईक यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांच्या शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भगवी घौडदौड सुरु करण्याचा मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी निर्धार केला असून, त्या अनुषंगाने शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजली गेली असून, गत निवडणुकीत शिवसेनेस अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. पण, पराभवाने खचून न जाता शिवसेनेने पुन्हा नव्याने उभारी घेतली आहे. आगामी काळात मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जुन्या पदाधिकाऱ्यांसह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. आगामी काळात पक्ष बांधणी साठी शिवदूतांची नेमणूक करावी, शाखांची उद्घाटने करावीत, तालुकावार शिवसैनिकांचे मेळावे घेण्याच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, महानगर समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, किशोर घाटगे, शिवाजी पाटील, तुकाराम साळोखे, उदय भोसले, माजी नगरसेवक राजू हुंबे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, युवती सेना शहर अधिकारी नम्रता भोसले, महिला आघाडीच्या पूजा कामते, मंगल कुलकर्णी, सुनीता भोपळे आदी उपस्थित होते.