no images were found
रंकाळा तलावावर साकारणार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान
मुंबई : कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्या अनेक वर्षात दुरावस्था झाली होती. कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. यास पुन्हा यश मिळाले असून, पर्यटन विभागाकडून रंकाळा तलाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान साकारण्यासाठी रु.४ कोटी ८० लाखांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी व निधी वितरणाचा शासन निर्णय झाला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, कोल्हापूर शहरास इ.स. काळापासून ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. श्री अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव हे देशभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करणारे प्रेक्षणीय स्थळ आहे. या तलावाचा इ.स.८०० ते ९०० च्या कालावधीपासूनचा इतिहास पहावयास मिळतो. कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा रंकाळा तलाव म्हणजे “कोल्हापूरची चौपाटी आणि कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह” म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात रंकाळा तलावाची झालेली दुरावस्था आणि संवर्धनासाठी तत्कालीन नगरविकास मंत्री व सद्याचे राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने नगरविकास विभागाकडून रु.१५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील पहिला टप्प्यातील रु.१० कोटीचा निधी महानगरपालिकेस वर्ग करण्यात आला आहे.ऐतिहासिक रंकाळा तलावास मंजूर झालेल्या निधीतून आगामी काळात रंकाळा तलावाचे सुशोभिकरण व संवर्धनाचे हितकारक काम होणार आहेत. तर कोल्हापूर शहरात आलेल्या पर्यटकांना विरंगुळ्यासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे, आबालवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, विकसित उद्यान, योगा केंद्र, पदपथ आदी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यानुसार रंकाळा तलाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान साकारण्यासाठी रु.४ कोटी ८० लाखांच्या निधीस जानेवारी २०२२ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या दि.२१ मार्च २०२३ च्या शासन निर्णया नुसार रंकाळा तलाव येथे विरंगुळा उद्यान साकारण्यासाठी रु.४ कोटी ८० लाखांच्या कामास प्रशासकीय मान्यता देवून निधी वितरणाचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच रंकाळा तलाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान साकारण्यासाठीच्या कामाची निविदा प्रक्रिया होवून काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहितीही श्री.राजेश क्षीरसागर यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.