no images were found
…….तर कॅनडाचा बाजार उठणार
भारत आणि कॅनडामधील तणाव कमी होताना दिसत नाही. जस्टिन ट्रुडो यांचे खलिस्तानवरील प्रेम कोणापासून लपलेलं नाही. आपल्या आरोपांना भारत अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, अशी अपेक्षाही त्यांनी केली नसेल. व्होट बँकेसाठी ट्रुडो यांची खलिस्तानींशी असलेली मैत्री आता त्यांना महागात पडताना दिसत आहे. ट्रुडो ना देशाची अर्थव्यवस्था वाचवू शकले आहेत ना त्यांची परराष्ट्र धोरणं. भारतामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळत होता. दरवर्षी कोट्यवधी रुपये कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मिळत होते, परंतु त्यावर आता संकटाचे ढग दाटून आले आहेत. ताज्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कॅनडात शिकण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत केवळ ५ टक्क्यांनी जरी घट झाली तरी कॅनडाचं मोठं नुकसान होणार आहे.कॅनडाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग भारतावर अवलंबून आहे. बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या तर, केवळ भारतीय विद्यार्थी दरवर्षी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत कोट्यवधी रुपये देत असतात.
भारतीय विद्यार्थी दरवर्षी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत अंदाजे ६८,००० कोटी रुपये (८ अब्ज डॉलर्स) जमा करतात. हा वाद सुरू झाल्यापासून भारतीय विद्यार्थी कॅनडा सोडून जात आहेत. भारतीय विद्यार्थ्यांसोबतच कॅनडाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात फटका बसलाय.दरवर्षी दोन लाख विद्यार्थीदरवर्षी भारतातून सुमारे दोन लाख विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षणासाठी जातात. २०२२ मध्ये सुमारे २,२५,००० भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडाचा व्हिसा देण्यात आला. कॅनडाला जाऊन तिथे शिकण्याचे मुख्य कारण म्हणजे अभ्यासासोबतच वर्क परमिट. तिकडे शिकणारे विद्यार्थी शिक्षण घेत असताना सहजरित्या कामही करू शकतात. इतर देशांमध्ये असं करता येत नाही. इमेज इंडियाचे अध्यक्ष रॉबिंदर सचदेव यांच्या मते, कॅनेडियन विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वर्षातून तीन वेळा जानेवारी, मे आणि सप्टेंबरमध्ये होतात. दरवर्षी भारतातून सुमारे दोन लाख विद्यार्थी तेथे प्रवेशासाठी जातात. परंतु भारत आणि कॅनडा यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता विद्यार्थ्यांवर होत आहे. तिथे जाण्यापूर्वी विद्यार्थी विचार करत असतात. हा तणाव दीर्घकाळ राहिल्यास आणि जानेवारीच्या प्रवेशातील विद्यार्थ्यांची संख्या ५ टक्क्यांनीही जरी कमी झाली तरी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला ७२७ मिलियन डॉलर्सचा फटका बसेल.विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्नभारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका आहे. भरमसाठ फी व्यतिरिक्त, भारतीय कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत निवास सुविधा, बँकांमधील ठेवी, प्रवासाचा खर्च, दैनंदिन वापराच्या वस्तूंची खरेदी इत्यादी खर्चांद्वारे देखील पैसे गुंतवतात. भारतासोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाला आता भारतीय विद्यार्थी गमावण्याची भीती आहे. कॅनडातील विद्यापीठं भारतीय विद्यार्थ्यांना गमावू इच्छित नाहीत. अशा परिस्थितीत ते भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना स्वस्त अभ्यासक्रम आणि सुरक्षिततेची हमीदेखील दिली जात आहे.