no images were found
जिओमार्ट’तर्फे महेंद्र सिंग धोनी याचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून स्वागत
कोल्हापूर : देशातील आघाडीच्या ई-मार्केटप्लेसपैकी एक असलेल्या रिलायन्स रिटेलच्या जिओमार्ट ने भारतीय क्रिकेटचा आयकॉन महेंद्रसिंग धोनी याला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. या व्यतिरिक्त, जिओमार्ट ने जिओउत्सव , सेलिब्रेशन ऑफ इंडिया या सणासुदीच्या मोहिमेचे रि-ब्रँड केले आहे, जे 8 ऑक्टोबर 2023 रोजी लाइव्ह होईल.
धोनीने देशाला साजरे करण्यासाठी अनेक प्रसंग दिले असून जिओउत्सव मोहीमेचा भर त्यावर आहे. परंतु कोणताच प्रसंग त्याच्या व्यस्त वेळपत्रकामुळे साजरा करता आला नाही. त्यामुळे आता नव्या जोमाने, सर्व आनंदाचे क्षण, सण आणि विशेष प्रसंग आपल्या प्रियजनांसोबत साजरे करण्याचा त्याचा निर्धार आहे. सुमारे 45 सेकंदांच्या फिल्ममध्ये धोनी दिसणार आहे.
जिओमार्ट चे सीईओ संदीप वरगंटी म्हणाले, “महेंद्र सिंग धोनी याच्या व्यक्तिमत्त्वात, जिओमार्ट प्रमाणेच विश्वास, विश्वासार्हता आणि खात्रीचे प्रतिनिधित्व करणारी एक परिपूर्णता आढळली. आमची नवीन मोहीम आपल्या प्रियजनांसोबत जीवन आणि त्याचे सर्व खास क्षण साजरे करण्याची संधी देते, ‘खरेदी’ हा या आनंदाचा अविभाज्य भाग आहे. सध्या आमच्या एकूण विक्रीपैकी सुमारे 60% नॉन-मेट्रो क्षेत्रांचा वाटा आहे, हे हळूहळू वाढीचे लक्षण आहे आणि डिजिटल रिटेलचे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे खरे फळ आहे.”
जिओमार्ट चा भर प्रादेशिक कलाकारांचा प्रचार करण्यावर आहे. हा मंच सध्या 1000+ कारागिरांसह काम करतो, त्यावर 1.5 लाख अद्वितीय उत्पादने विकली जातात. खरं तर, कॅम्पेन शूटचा एक भाग म्हणून, वरगंटी यांनी बिहारमधील पुरस्कारप्राप्त कारागीर अंबिका देवी यांनी बनवलेले मधुबनी पेंटिंग धोनीला भेट दिले. हे जिओमार्ट चे लक्ष केवळ ग्राहकांना उत्पादने आणि सर्वोत्तम अनुभव देण्यावरच नाही; तर लाखो कारागीर आणि एसएमबीएस यांना सहजतेने व्यवसाय करण्यास सक्षम करण्यावर आहे.
महेंद्रसिंग धोनी म्हणाले, “जिओमार्ट’च्या मूल्यांचा अर्थ मी ठामपणे जाणतो आणि त्यांचे समर्थन करतो, एक स्वदेशी ई-कॉमर्स ब्रँड म्हणून ते भारतातील डिजिटल रिटेल क्रांतीला समर्थन देण्याच्या उद्देशाने प्रेरित आहेत. भारत त्याची प्रखर संस्कृती, लोक आणि सणांसाठी ओळखला जातो, जिओमार्ट ची जिओउत्सव मोहीम ही भारत आणि तिथल्या लोकांच्या उत्सवासाठी एक चिन्ह आहे. जिओमार्ट सोबत येण्यासाठी आणि लाखो भारतीयांच्या खरेदी प्रवासाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
हा फिल्म जिओमार्टची क्रॉस कॅटेगरीतील तज्ज्ञता अधोरेखित करण्यासाठी तयार करण्यात आली असून हा सणांचा तसेच सर्वोत्तम शॉपिंग डील व मंचावर उपलब्ध सवलतींचा उत्सव आहे.
गेल्या वर्षी, जिओमार्ट ने हॉरिझोंटल, क्रॉस-श्रेणी पद्धतीचा अवलंब केला होता. ज्यामध्ये सर्व विभागांमध्ये उत्पादनांची ऑफर देण्यात आली होती. इलेक्ट्रॉनिक्सपासून फॅशन आणि सौंदर्य ते होम डेकोरपर्यंत, जिओमार्ट ने प्लॅटफॉर्मवरील निवड आणखी वाढवण्यासाठी रिलायन्सच्या मालकीच्या ब्रँड्समध्ये अर्बन लॅडर, रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स ज्वेल्स, हॅमलेज यासह इतर ब्रँड्सचा समावेश केला आहे. हा जलद विस्तार भारतातील सर्वात मोठा घरगुती ई-मार्केटप्लेस बनण्याच्या जिओमार्ट च्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आहे.