
no images were found
…….. तेव्हा अजित पवारांना असुरक्षित वाटत होतं -बावनकुळे
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “शरद पवार शीर्षस्थानी असताना अजित पवारांना असुरक्षित वाटत होतं,” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. तसेच शरद पवारांची ही स्थिती का झाली याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं, असं म्हणत टोला लगावला. ते शनिवारी (७ ऑक्टोबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांवर ही वेळ आली आहे. मला त्यांच्याविषयी फार व्यक्त होता येणार नाही. मात्र, शरद पवारांची ही स्थिती का झाली, जयंत पाटलांची ही स्थिती का झाली? त्यांना त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे. असं का झालं याचा त्यांनी विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरेंनाही त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे ही स्थिती का झाली?