
no images were found
प्राचार्य एस. डी. आकोळे व प्रा. बी. बी. शेंडगे यांच्याकडून भगवान महावीर अध्यासनास रू २५००० ची बृहत देणगी
कोल्हापूर (प्रतिनिधी ): दक्षिण भारत जैन सभा पदविधर संघटणेचे सल्लागार सदस्य प्रा.म एस. डी. आकोळे व सचिव श्री बी. बी. शेंडगे यांनी भगवान महावीर अध्यासनास दि. ०५/१०/२०२३ रोजी दिली. व एस. डी. आकोळे यांनी १५००० रूपये व प्रा. बी. बी. शेंडगे यांनी १०००० रूपये देणगी भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित वास्तूकरीता दिली. प्राचार्य एस. डी. आकोळे व प्रा. बी. बी. शेंडगे यांचे अभिनंदन मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील तसेच मा. कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी केले.
भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसा प्रेमी व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन डॉ. विजय
ककडे, प्राध्यापक भगवान महावीर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस 100 % पात्र आहे. सदर देणगी ऑनलाईन व स्कॅन कोड ने देणेची सुविधा उपलब्ध आहे. तरी देणगी
द्यावयाची असल्यास डॉ.विजय ककडे 9422423941 यांच्याशी संपर्क साधावा.