Home क्राईम मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक PMLA कोर्टाचं निरीक्षण

मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक PMLA कोर्टाचं निरीक्षण

0 second read
0
0
33

no images were found

मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक PMLA कोर्टाचं निरीक्षण

राज्याचे कॅबीनेट मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट महेश गुरवचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केले असल्याचे पीएमएलए कोर्टाने निरीक्षण नोंदवले आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप केले होते. यामध्ये कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांचाही समावेश होता. दरम्यान काल यावर सुनावणी झाली यातील महेश गुरव याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने फेटाळला.न्यायालयाने ४६ वर्षीय महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन नाकारला तसेच एफआयआरमध्ये आरोप केल्याप्रमाणे, त्याला मुख्य आरोपी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांमधून कमावलेल्या पैशाची ठोस माहिती होती. असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
लेखापरीक्षक/सनदी लेखापाल म्हणून काम करत असताना अर्जदार गुरव यांनी पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रणालींचा वापर केला होता. तसेच हे पैसे शेल कंपन्यांमध्ये वळवले गेले, ज्यात हसन मुश्रीफ यांचे पुत्र संचालक असल्याचा आरोप आहे.
गुरव हा त्या कंपन्यांसाठी लेखा परीक्षक/सनदी लेखापाल म्हणून काम पाहत असल्याची माहिती विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी २७ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. कंपनी रजिस्ट्रारने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …