no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘प्रथम कोड’ स्पर्धा उत्साहात संपन्न
कसबा बावडा( प्रतिनिधी): डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स विभागाच्या कोडींग क्लबच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी गणेश उत्सव निमित्त ‘प्रथम कोड’ ( डिजीटल गणेशा) स्पर्धा उत्साहात पार पडली. महाविद्यालयाच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यानी यावेळी प्रोग्रामिंग लॅग्वेजचा वापर करून ‘गणेशा’च्या डीजीटल प्रतिकृती तयार केल्या.
विद्यार्थ्यांचे टेक्निकल नॉलेज, कल्पकता, कम्युनिकेशन व कोडींग स्किल दाखवण्यासाठी ची संधी यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली होती. ही स्पर्धा चार कोडिंग लँग्वेज मध्ये विभाजित करण्यात आली होती.सॉफ्टवेअर डेवलपर प्रशांत पायमल आणि प्रिन्सिपल सॉफ्टवेअर डेवलपर अभिजीत पाटील यांनी या स्पर्धेत परिक्षण केले.
यामध्ये ‘सी’ लँग्वेज विभागात वर्धन पाटील याने प्रथम तर प्रणव पाटील व तन्वी पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. Java गटामध्ये आर्यन पाटील व पवन मालगावी(प्रथम), सिध्देश पाटील व अथर्व डोणकर(द्वितीय), Python गटामध्ये अर्णव देशपांडे (प्रथम) आर्यमन देसाई व प्राची जाडकर (द्वितीय), other गटामध्ये आदित्य देशमुख व संतोष माने (प्रथम), राधेय पाटील व यश ऐनापुरे (द्वितीय) स्थान मिळवले. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेसाठी कोडिंग कल्बच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख राधिका ढणाल, कॉम्प्युटर सायन्स विभाग समन्वयक सौ. एस. एस. कोकाटे, कोडिंग क्लब समन्वयक सौ. रंजिता जाधव आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्टार डॉ. एल. व्ही. मालदे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचें मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कसबा बावडा : प्रथम कोड स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत प्रा. राधिका ढणाल, प्रा. एस. एस. कोकाटे, प्रा. रंजिता जाधव आदी.