no images were found
इंडियन आयडॉल सीझन 14 घेऊन येत आहे ‘म्युझिक का सबसे बडा त्योहार’
कोल्हापूर – भारतीय मनोरंजन क्षेत्रात आपला सखोल ठसा उमटवून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल या गायन रियालिटी शोने देशातील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित गायन रियालिटी शो म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. आता पुन्हा एकदा ही वाहिनी घेऊन येत आहे इंडियन आयडॉल सीझन 14, जो ‘म्युझिक का सबसे बडा त्योहार’ असेल याची हमी आहे. फ्रेमॅन्टल इंडिया द्वारा निर्मित या शोमध्ये परीक्षकांच्या पॅनेलवर आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेती, गायिका श्रेया घोषाल, बॉलिवूडचा मेलडी किंग कुमार सानू आणि उत्कृष्ट संगीतकार, गायक आणि परफॉर्मर विशाल दादलानी. देशाच्या विविध प्रांतांमधून हुडकून आणलेल्या प्रतिभेवर ते गाण्याचे संस्कार करतील व त्यांना पैलू पाडण्याचे काम करतील. या शोच्या 14 व्या सत्रात होस्ट म्हणून हुसैन कुवाजेरवाला याचे पुनरागमन होत आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेला हा शो प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून प्रसारित होणार आहे.
‘एक आवाज लाखों एहसास’ हे ब्रीद घेऊन आलेले, श्रोत्यांच्या मनात अनेक भावभावना जागृत करण्यास सक्षम असलेले खास आवाज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आपल्या गायन कौशल्याने परीक्षकांना प्रभावित करण्यास सरसावलेल्या या स्पर्धकांच्या कहाण्या देखील फार वेधक, रोचक आणि प्रेरणादायक असणार आहेत. आजच्या काळातील आघाडीची गायिका श्रेया घोषाल हिला खात्री आहे की, उत्तमातील सर्वोत्तम गायक त्यांना नक्की सापडेल. ती स्पर्धकांचे केवळ परीक्षण करणार नाही, तर त्यांना मार्गदर्शन देखील देताना दिसेल. कुमार सानू परीक्षक म्हणून या सत्रात पहिल्यांदाच काम करत असला, तरी अनुभवाने आणि वयाने तो या पॅनलमध्ये सर्वात ज्येष्ठ आहे. संगीत क्षेत्रातील त्याच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग तो स्पर्धकांना करून देईल. विशाल दादलानी सर्वोत्तम ‘3D’ परफॉर्मन्सचा शोध घेताना दिसेल, ज्यात तीन परिमाणे असतील आवाजाची रेंज आणि पोत, अचूकता साधण्याची क्षमता आणि गाणे उत्तम निभावण्याचे कसब. स्पर्धकांना प्रोत्साहित करून तो त्यांच्यासाठी विधायक प्रतिक्रिया देताना दिसेल.
ऑडिशन फेरीच्या प्रोमोजमधून कार्यक्रमाचा एकंदर दर्जा खूप उंच जाणार हे प्रेक्षकांच्या ध्यानात आलेच असेल, मग ते मुंबईच्या शुभदीपने सादर केलेले आमी जे तोमार (भूल भुलैया 2 ) असो, ज्याचे कौतुक खुद्द श्रेयाने “तू अद्भुत आहेस” असे केले, आद्या मिश्राने अप्रतिम सादर केलेले ‘नमक इश्क का’ (ओमकारा) असो, ज्याचे कौतुक करताना विशाल दादलानी म्हणाला की “मी आजवर स्त्रीचा असा आवाज ऐकलेला नाही”, किंवा परीक्षक कुमार सानूला चकित करून सोडणारा आणि त्याच्याकडून ‘वन्स मोर’ घेणारा कानपूरच्या वैभव गुप्ताचा ‘हमका पीनी है’ (दबंग) हा परफॉर्मन्स असो. होस्ट हुसैन या उत्साहाने सळसळणाऱ्या आणि काहीशा भांबावलेल्या स्पर्धकांचे मनोबल वाढवताना दिसेल. विविध काळातील, विविध प्रकारची गाणी उत्तम रित्या सादर करू शकतील अशा प्रतिभावंतांवर प्रकाशझोत टाकणारे हे सत्र अभूतपूर्व रीतीने हा संगीत सोहळा साजरा करताना दिसेल.
7 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे, इंडियन आयडॉल सीझन 14, बघा दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
श्रेया घोषाल, परीक्षक, इंडियन आयडॉल – सीझन 14
“अगदी सुरुवातीपासून इंडियन आयडॉलने असामान्य गायन प्रतिभा शोधून काढून तिचे संगोपन करण्याची जबाबदारी निरंतर पार पाडली आहे. या कार्यक्रमाशी सखोल नाते आहे- वैयक्तिक आणि भावनिक देखील. 14 व्या सत्राचे ब्रीद आहे, ‘एक आवाज लाखों एहसास’, ज्यामधून एक असा आवाज शोधण्याचा ध्यास आहे, जो श्रोत्यांच्या मनात असंख्य भावना जाग्या करू शकेल. हा मंच गाजवणाऱ्या नवोदित गायकांच्या प्रतिभेला पैलू पाडण्यासाठी मी उत्सुक आहे.”
विशाल दादलानी, परीक्षक, इंडियन आयडॉल – सीझन 14
“या सत्रात स्पर्धकांनी लक्षणीय गायन प्रतिभेचे प्रदर्शन केले आहे. आणि हो, त्यांच्या हृदयस्पर्शी कहाण्यांनी देखील मी हेलावून गेलो आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांच्या अंतःकरणाला देखील त्या स्पर्श करतील आणि प्रेरणा देखील देतील. ऑडिशनच्या टप्प्यात आम्ही काही असे विलक्षण आवाज ऐकले आहेत, जे श्रोत्याच्या मनात भावनांचा कल्लोळ माजवण्यास समर्थ आहेत. मी नेहमी स्पर्…