
no images were found
सकल हिंदू समाजातर्फे शौर्य जागरण यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. शिवछत्रपतींचा पराक्रम, मराठा सरदारांचा तसेच मावळ्यांचा पराक्रम ,स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा आत्मबलिदानाचा पराक्रम, आपल्या पूर्वजांनी राष्ट्र आणि धर्म टिकवण्यासाठी दिलेली योगदान याचे स्मरण सर्वांना व्हावे आणि देव, देश ,धर्म रक्षणासाठी तरुणांनी संकल्प हातात घ्यावा ही आता काळाची गरज बनली आहे. देश विघातक शक्तींना तोंड देण्यासाठी समाजाने संघटित होऊन राष्ट्र बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .आपले संस्कार ,मूल्ये, परंपरा याचे जतन करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे . विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे आयोजित ही राष्ट्रव्यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्ति करण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच कोल्हापुरातील सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटना या यात्रेत सहभागी होणार आहेत.
सर्व नागरिकांनी या यात्रेत सहभागी होऊन या राष्ट्र कार्यामध्ये आपले योगदान द्यावें ,असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत केले गेले. या यात्रेमध्ये मंगळवारी दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजी भव्य बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे. सर्व तरुणांनी आपल्या दुचाकी वाहनावरून दुपारी चार वाजता ताराबाई पार्क येथे जमावे, असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठांचे सुरेश यादव ,हिंदू एकताचे दीपक देसाई ,हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे, शिवशाही फाउंडेशनचे सुनील सामंत, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, हिंदू एकता आंदोलनाची गजानन तोडकर, भारतीय इतिहास संकलन समितीचे उमाकांत राणींगा, शिवसेना शिंदे गटाचे श्री उदय भोसले , शिवसेना शिंदे गटाचे किशोर घाडगे ,अखिल भारतीय हिंदू महासभेचे मनोहर सोरप शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे आशिष लोखंडे हजर होते.