no images were found
कलाकार मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सांगत आहेत खास टिप्स
१० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य समस्यांबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी वर्ल्ड मेण्टल हेल्थ डे मानला जातो. एण्ड टीव्ही कलाकार सर्वांना मानसिक आरोग्याला अधिक प्राधान्य देण्याचे आवाहन करत आहेत आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्याबाबत टिप्स सांगत आहेत. टिप्स सांगणारे हे कलाकार आहेत मोहित डागा (अशोक, ‘दूसरी मॉं’), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘दूसरी मॉं’मधील मोहित डागा ऊर्फ अशोक म्हणाले, ”अशी एक वेळ होती जेव्हा मला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला, ज्यामुळे मला चिंता, राग येण्यासोबत नैराश्य आले. यावर उपाय म्हणून मी स्वत:ची काळजी घेऊ लागलो, ज्यामधून मला मन:शांती मिळाली. मी माझे मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी चिंतन व वाचन करू लागलो. अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी व उत्तम संबंध निर्माण करण्यासाठी मी चिंतन करतो, जो माझ्या दैनंदिन नित्यक्रमाचा भाग आहे. घरी असो किंवा सेटवर मी वेळात वेळ काढून चिंतन करतो, यामुळे मला प्रबळ राहण्यास व अवधान केंद्रित राहण्यास मदत होते, परिणामत: जीवन अधिक उत्साही झाले आहे. माझा आनंदी राहण्यासाठी स्वत:हून मेहनत घेण्यावर दृढ विश्वास आहे. सर्वांना मानसिक आरोग्य दिनाच्या आनंदमय शुभेच्छा.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”फिटनेसमधून शरीरयष्टी उत्तम राहते. अंतर्गत शक्ती वाढवण्यासाठी आणि मन:शांतीसाठी फिटनेस उत्तम असणे गरजेचे आहे. आरोग्यदायी मन हा शारीरिक आरोग्य उत्तम असण्याचा पाया आहे. शारीरिक आरोग्याच्या तुलनेत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक लोक मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करतात, भिती किंवा लाज वाटत असल्यामुळे त्याबाबत मदत घेणे टाळतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आजच्या गतीशील जीवनामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. मी दररोज दीर्घ श्वास घेणे व चिंतन करते. यामुळे मला अवधान केंद्रित ठेवण्यास, सकरात्मकता राखण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत होते.