no images were found
पॉप्युलर व्हेइकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर
भारतातील अग्रगण्य वैविध्यपूर्ण ऑटोमोबाईल डीलर पॉप्युलर व्हेइकल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड (“द कंपनी”) तर्फे मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) सादर करण्यात आला आहे. पूर्णतः एकात्मिक व्यवसाय मॉडेलसह आर्थिक वर्ष २०२३ पर्यंतच्या महसुलाच्या बाबतीत कंपनी भारतातील एक अग्रगण्य वैविध्यपूर्ण ऑटोमोबाईल डीलरशिप आहे (स्रोत: क्रीसील अहवाल)
कंपनीने २५० कोटी रुपयांपर्यंत इक्विटी शेअर्स (दर्शनी मूल्य २ रुपये) च्या फ्रेश इश्यूद्वारे आणि १४,२७५,४०१ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या (“एकूण ऑफर आकार”) ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे निधी उभारण्याची योजना आखली आहे.
कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपन्यांनी घेतलेल्या १९२ कोटी रुपयांच्या काही कर्जाच्या पूर्ण किंवा काही प्रमाणात परतफेड आणि/किंवा प्री-पेमेंटसाठी करण्याचा प्रस्ताव आहे; आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी शिल्लक रक्कम वापरण्यात येईल.
विक्रीच्या ऑफरमध्ये बनियन ट्री ग्रोथ कॅपिटल II LLC (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) द्वारे १४,२७५,४०१ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड या स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वीचे एडलवाईस सिक्युरि