no images were found
आधुनिक जगातही गांधी विचार महत्वाचे – प्रा द्विवेदी
कसबा बावडा/वार्ताहर: महात्मा गांधी यांचे विचार आजच्या आधुनिक काळातही अतिशय महत्त्वाचे आहेत असे प्रतिपाद प्रसिद्ध गांधीवादी प्राध्यापक राम प्रकाश द्विवेदि यांनी केले. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्च विभागाच्यावतीने गांधी जयंती निमित्त ‘गांधींचे विचार आणि आधुनिकता’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा. द्विवेदी हे ‘नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर ऑफ इंडिया’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे आधुनिक जगातील सात प्रमुख उद्दिष्टे आणि ते सोडविण्याचे विविध मार्ग याबद्दल त्यांनी सविस्तर मांडणी केली. कामाशिवाय संपत्ती, विवेका शिवाय आनंद, शीलाशिवाय ज्ञान, नैतिकते विना धन, मानवते शिवाय विज्ञान, त्यागाशिवाय धर्म, तत्त्वाशिवाय राजकारण असू नये असे विचार प्रा. द्विवेदी यांनी मांडले. महात्मा गांधी यांनी मांडलेले विचार आजच्या आधुनिक काळातही तंतोतंत लागू होतात. गांधी विचार व त्यांच्या मार्गावर चालणे हेच खरे जीवनाचे सार्थक असल्याचे प्रा. द्विवेदी यांनी सांगितले.
सध्याच्या धावपळीच्या युगात गांधी विचार किती महत्त्वाच्या असलेल्या अनेक आहेत गांधी विचारांनी समाजात समतोल साधला जाईल का? या विषयावर त्यांनी हा उहापोह केला.
रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी लोखंडे यांनी गांधी विचारांचे महत्त्व आजच्या काळातही अबाधित आहे, प्रा. द्वीवेदी यांनी मांडलेले विचार सर्वांनी विशेषत: युवा पिढीने अंगीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले.
स्टेम सेल विभाग प्रमुख डॉ. मेघनाथ जोशी यांनी प्रा. द्विवेदी यांचे स्वागत केले. डॉ अर्पिता पांडे तिवारी यांनी आभार मानले. व्याख्यानाला डी. वाय पाटील विद्यापीठातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांच्या मार्गदर्शना या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.