Home धार्मिक दशलक्षण – षोडशकरण महापर्वाची भव्य शोभायात्रेने सांगता

दशलक्षण – षोडशकरण महापर्वाची भव्य शोभायात्रेने सांगता

8 second read
0
0
40

no images were found

दशलक्षण – षोडशकरण महापर्वाची भव्य शोभायात्रेने सांगता

कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : अभूतपूर्व उत्साहात आणि ‘ जय जिनेन्द्र ‘ च्या जल्लोषात निघालेल्या शिस्तबद्ध शोभायात्रेने गेली सोळा दिवस सुरू असलेल्या दशलक्षण सोडस्करण महाप्रवाहाची सांगता झाली .प्रतिमा विद्या प्रतिष्ठान व श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर संघ आर के नगर यांच्या वतीने शेंडा पार्क येथील भव्य मैदानात भव्य मंडपात दशलक्षण विवेचन प्रवचने प . पू . नियमसागरजी महाराज यांच्या अमृत वाणीतून दोन सत्रात संपन्न होत होती .

        आज प्रतिभनगर येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेने त्यांचा उत्साही, भक्तीमय वातावरणात समारोप झाला . या मध्ये शहर पंचक्रोशीसह पश्चिम महाराष्ट्रात – निपाणी -बेळगाव सह सीमाभाग – कोकण- मधील हजारो भाविक श्रावक – श्राविका सहभागी झाले होते. पांरपारिक वेशभूषेत ४० रथामध्ये बसलेले श्रावक – श्राविका – भगवे फेटे – पंचरंगी झेंडे – पताका घेत ५० घोड्यावरून सहभागी बालके – महिला , यामुळे अवघे वातावरण उत्साही बनले होते .

      या शोभायात्रेच्या सुरवातीस प . पू . मुनीश्री नियम सागर जी महाराज, यांच्या सह पवित्र सागरजी महाराज वृषभ सागर जी महाराज,अभिनंदन सागर जी महाराज, सु पार्श्व सागर जी महाराज ,शुल्लक संयमसागर जी महाराज सहभागी झाले होते .अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेली ही शोभायात्रा राजारामपुरी पहिली गल्ली जनता बाजार येथे पोहोचली यासाठी प्रतिमा विद्या प्रतिष्ठान गेले तीन महिन्यापासून अथकपणे कार्यरत असलेले अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष सुरेश भोजकर , अशोक बहिरशेट ,खजानिस सचिन बहिरशेट, कार्यअध्यक्ष अमर मार्ले, प्रवीण जिर्गे डॉ अनिल डोर्ले,ए बी कमते ,राजू शेटे,सचिन मठारी, विशाल मिठारी, भूषण कावळे,वैभव कोगनुळे, अमोल घोडके , शीतल मंडपे अवनिश जैन ,सतीश पत्रावळे अनुपम भोजकर,अरुण तीर्थ, अमित बागे, सचिन पाटील, संजय टेंभुर्ले,यांच्यासह दिडशे कार्यकर्ते समवेत १६ विविध समित्या सह केलेले सुक्ष्म नियोजन महत्वाचे ठरले .आर के नगरसह शोभायात्रा मार्गावर माजी मंत्री, आमदार सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर सह विविध संस्था संघटनेने लावलेल्या स्वागतपर लावलेल्या डिझीटल बॅनर नी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते .

        तर आर के नगर येथील दशलक्षण महाप्रर्वाच्या दरम्यान आमदार ऋतुराज पाटील ,वैशाली राजेश शिरसागर, माजी आमदार अमल महाडिक, हुपरीचे उद्योजक महावीर घाट , भोपाल शेटे, राजू लाटकर, महेश उत्तुरे यांच्यासह सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन मुनी श्री चे आशीर्वाद घेतले .एकंदरीत प्रतिमा विद्या प्रतिष्ठान आयोजित सामाजिक सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि युवा पिढीला नैतिक मूल्याचे शिक्षण कृतीशीरपणे देण्यासाठी दशलक्षण महापर्व आणि भव्य उपक्रम शोभायात्रा यशस्वी ठरली .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजपा स्थापना दिन उत्साहात संपन्न

भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भाजपा स्थापना दिन उत्साहात संपन्न use    …