
no images were found
राष्ट्रपिता म गांधी ,लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी
कोल्हापूर (प्रतिनीधी ) :विद्यापीठ सोसायटीचे तपोवन येथील
सौ शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूल मध्ये आज म गांधी आणि दुसरे पंतप्रधान लाबहाद्दूर शास्त्री यांची जयंती मोठ्या श्रद्धेने विविध उपक्रमांनी साजरी केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मिनी कापसे आणि इतिहास शिक्षिका सौ.स्नेहल केसरकर मॅडम यांच्या हस्ते दोन्हीही युगपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सौ.स्नेहल केसरकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याविषयीचा समग्र इतिहास सांगून त्यांचा जीवन परिचय करून दिला… याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.